उदयापासुन ओबीसी जागर अभियानाला पंढरपूर येथून प्रारंभ

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

उदयापासुन ओबीसी जागर अभियानाला पंढरपूर येथून प्रारंभ

 

राज्यातील कॉंग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेनेच्या महाविकास आघाडी सरकारची 52 टक्के असलेल्या ओबीसी समाजाबद्दल असलेली उदासीन भूमिका, भारतीय जनता पक्षानी आपल्या सरकारच्या कार्यकाळात ओबीसी हितार्थ घेतलेल्या निर्णयाची माहिती ओबीसी समाजाला व्हावी व राज्य सरकारने आपल्या नाकर्तेपणामुळे ओबीसीचे राजकीय आरक्षण घालवून ओबीसी समाजाशी विश्वासघात केला इत्यादि सर्वं विषय घेवून भाजपा ओबीसी मोर्चाच्यावतीने 9 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर २०२१ पर्यन्त संपूर्ण महाराष्ट्रात भाजपा ओबीसी मोर्च्याचे प्रदेश अध्यक्ष श्री.योगेश अण्णा टिळेकर यांच्या नेतृत्वात ओबीसी जागर अभियान राबविन्यात येणार आहे.

 आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत पंढरपूरच्या पांडुरंगाच्या चरणी साकड़ घालून ओबीसी जागर अभियानाचा शुभारंभ होईल. यावेळी भाजपा ओबीसी मोर्च्याचे प्रदेश अध्यक्ष श्री.योगेश अण्णा टिळेकर, भाजपा ओबीसी मोर्च्याचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री श्री.हंसराजजी अहीर, माजी ओबीसी मंत्री व ओबीसी मोर्च्याचे प्रदेश प्रभारी आ.डॉ. श्री.संजयजी कुटे, सोलापुर चे खासदार श्री. सिद्धेश्वरजी स्वामी महाराज, खा. श्री.रणजीतसिंह नाईक निंबाळकर, आ.सुभाषबापू देशमुख, आ.विजयकुमार देशमुख, आमदार श्री.प्रशांतजी परिचारक, आ.रणजीतसिंह मोहिते पाटील, आमदार श्री.समाधानजी अवताड़े, आ.राम सातपुते, आ.जयकुमार गोरे, आ.गोपिचंद्जी पडळकर, आ.सचिनजी कल्याणशेट्टी, आ.राजाभाऊ राऊत, ओबीसी मोर्च्याचे प्रदेश सरचिटणीस श्री.संजयजी गाते, प्रदेश महिला संपर्क प्रमुख श्रीमती वनिता लोंढे, युवक संपर्क प्रमुख श्री.करण पोरे, भाजपा जिल्हाध्यक्ष श्री.श्रीकांत दादा देशमुख प्रामुख्याने उपस्थित राहणार आहे.

ओबीसी जागर अभियानच्या शुभारंभानंतर स्थानीय संत शिरोमणी तनपुरे महाराज मठ येथे शनिवार दि.9 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता ओबीसी जागर मेळावा होणार आहे. या मेळाव्यात ओबीसी जागर अभियानाच्या रथाला हिरवी झेंडी दाखवून सुरुवात होईल व हा रथ आगामी 15 दिवस संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात फिरेल. या मेळाव्याला पश्चिम महाराष्ट्रातुन मोठ्या संख्येत ओबीसी बंधूभागिनीं उपस्थित राहतील.

या मेळाव्याची संपूर्ण तयारी ओबीसी मोर्च्याचे प्रदेश उपाध्यक्ष व पश्चिम महाराष्ट्र प्रभारी श्री.प्रल्हाद सायकर, संपर्क प्रमुख सौ.वीणा सोनवलकर,प्रदेश उपाध्यक्ष श्री.आप्पासाहेब देशमुख यांच्या मार्गदर्शनात भाजपा ओबीसी मोर्च्याचे जिल्हा अध्यक्ष श्री.बाळासाहेब ढगे, शहर भाजपा अध्यक्ष श्री विक्रम शिरसट, तालुकाध्यक्ष लक्ष्मणतात्या धनावडे आदींनी मेळाव्याला जास्तीत जास्त संखेने उपस्थित राहावे असे आवाहन केले आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here