उजनीत ८ हजार ४०० क्युसेक्सने पाणी येण्यास सुरुवात

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

उजनीत ८ हजार ४०० क्युसेक्सने पाणी येण्यास सुरुवात

सोलापूर // प्रतिनिधी 

पुणे जिल्ह्यात व भीमा खो-यासह उजनी धरण पाणलोट क्षेत्रात ओढ दिलेल्या पावसाने अखेर काल मंगळवारपासून संततधार पडत असल्याने या पावसामुळे काल बुधवारी (दि. २१ ) सायंकाळी सहा वाजता दौंड येथून ८ हजार ४०० क्युसेक्स विसर्ग उजनी धरणात मिसळत आहे.

सध्याची पाणी पातळी वजा ३.३४ टक्के पाणीसाठा आहे. येत्या दोन दिवसात उजनी धरण पाणीपातळी मृत साठ्यातून बाहेर येऊन प्लसमध्ये येण्याची आशा आहे. गत वर्षी २० जुलै रोजी उजनी धरण मृत साठ्यातून बाहेर आले होते.

काल बुधवारी सायंकाळी सहा वाजता दौंड येथून ८ हजार ४०० क्युसेक विसर्ग उजनी धरणात मिसळत होता. सध्या पाणी पातळी वजा ३.३४ टक्के पाणीसाठा आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here