मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांना प्रहार संघटनेच्या वतीने निवेदन सादर

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांना प्रहार संघटनेच्या वतीने निवेदन सादर

सोलापूर // प्रतिनिधी 

पंढरपूर तालूक्यातील उंबरे पागे येथील ग्रामपंचायत हद्दीत ग्रामपंचायत च्या ताब्यात असलेले गावठाण गावातील शहाजी माणिक मुळे व इतर कुटुंबातील काही लोकांनी लोकांनी हडपले असून त्यासंदर्भात प्रहारचे तालुकाध्यक्ष नाना इंगळे व बापू मोहिते यांनी गेल्या पंधरा दिवसापूर्वी संबंधित पंचायत समितीचे बीडीओ यांच्या दालनासमोर धरणे आंदोलन केले होते,तसेच संबंधित प्रकार महाराष्ट्र राज्य मंत्री बच्चुभाऊ यांच्या कानावर सुद्धा घातला होता या संदर्भात लक्ष घालण्यासाठी राज्यमंत्री बच्चुभाऊ यांनी संबंधित तहसीलदार व बिडिओ यांना पत्र काढून सुद्धा संबंधित प्रकरणाकडे जाणून बुजून दुर्लक्ष करून अधिकाऱ्यांनी पडदा टाकण्याचे काम केले.
म्हणून आज दिनांक 22/07 2021 रोजी जिल्हा परिषद चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ मस्के पाटील शहराध्यक्ष अजित भाऊ कुलकर्णी यांच्या नेतृत्वात संबंधित प्रकरणाची दखल येत्या 2 तारखेपर्यंत घेऊन गावठाण हस्तगत करणाऱ्या लोकांवर कारवाईची मागणी करण्यात आली त्यासंदर्भात जिल्हा परिषदेच्या ॲडिशनल मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय चंचल पाटील मॅडम यांच्याशी चर्चा करून संबंधितावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आणि या आशयाचे निवेदन त्यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले येत्या दोन तारखेपर्यंत उंबरे पागे गावातील गावठाण जमिनीवर अतिक्रमण झालेले आहे आणि जवळ जवळ दोनशे च्या वरती उतारे बोगस बनवून त्या ठिकाणी जमीन हडपण्याचा प्रकार घडलेला आहे याची सखोल चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी यासंदर्भात ही चर्चा करण्यात आली.
जर दोन तारखेपर्यंत उंबरे पागे गावातील गावठाणाचा प्रश्न निकाली काढून गोरगरीब जनतेला न्याय देण्याचे काम झेडपी प्रशासनाने केले नाहीतर दोन तारखेला संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे दालन ताब्यात घेऊन आंदोलन करण्याचे या वेळी सांगण्यात आले.
यावेळी प्रहार जिल्हाध्यक्ष दत्ता मस्के पाटील शहराध्यक्ष अजित कुलकर्णी पंढरपूरचे तालुका अध्यक्ष नानासो इंगळे बापू मोहिते रोहित साठे, शहाजी सलगर प्रकाश कांबळे आदीजण उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here