नेहमी सामाजिक कामांमध्ये मोठ्या प्रमाणात अग्रेसर राहिलेले तसेच सर्व गोरगरीब वंचित, दीनदलीत कष्टकरी शेतकरी वर्गाच्या सामाजिक समस्या सोडवणारे, त्यांच्या सुखदुःखामध्ये नेहमी तत्परतेने सहभागी होणारे, तहसील कचेरी पंचायत समिती पोलीस स्टेशन कृषी विभाग बांधकाम विभागामध्ये एक आपल्या नावाची मोठ्या प्रमाणात ओळख निर्माण केलेले सामाजिक कार्यकर्ते इब्राहिम शेख यांचे सामाजिक कार्य पाहून आज माननीय राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या विचाराला प्रेरित होऊन, व महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याचे जाहीर करून इब्राहिम शेख यांची राष्ट्रवादी अल्पसंख्यांक जिल्हा सरचिटणीस पदी निवड करण्यात आली आहे.
या निवडीचे पत्र जिल्हाध्यक्ष झाकीर शेख यांनी यावेळी इब्राहिम शेख यांना दिले. यावेळी वैराग चे निरंजन भूमकर हे उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचारांना व पक्षाचे सर्व ध्येयधोरणे, व योजना सर्व तळागाळातील सर्व सामान्य कष्टकरी जनतेपर्यंत पोहोचविणार असल्याचे यावेळी नूतन राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा सरचिटणीस इब्राहिम शेख यांनी सांगितले.