इनरव्हील क्लब, पंढरपूरच्या नूतन अध्यक्षपदी सौ.उज्वला उमेश विरधे यांची निवड

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

इनरव्हील क्लब, पंढरपूरच्या नूतन अध्यक्षपदी सौ.उज्वला उमेश विरधे यांची निवड

सोलापूर // प्रतिनिधी

विविध सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणारी विश्वव्यापी इनरव्हील क्लब ऑफ पंढरपूरच्या नूतन पदाधिकारी यांचा पदग्रहण सोहळा पंढरपूर येथील कर्मयोगी सभागृह येथे नुकताच पार पडला. यामध्ये पुढील वर्षासाठी अध्यक्ष म्हणून प्राध्यापिका सौ.उज्वला उमेश विरधे यांनी पदभार स्वीकारला. त्यांचा सत्कार सौ.सीमाताई प्रशांत परिचारक व पिडीसी नगीना बोहरी यांचे हस्ते संपन्न झाला.

जागतिक महिला सबलीकरण हे जागतिक इनरव्हील क्‍लबचे ध्येय आहे. तळागळातील सर्वसामान्यापर्यंत मदत पोचविणे, ग्रामीण भागातील महिलांना रोजगार मिळून देण्यासाठी त्यांना गरजेनुसार प्रशिक्षण देणे, रक्तदान-आरोग्य तपासणी शिबीर आयोजन करणे, अन्नधान्य वाटप करणे तसेच स्ट्राँग वुमन स्ट्राँग वर्ड महिला सक्षमीकरण करणेसाठी प्रयत्न करणार आदि बाबतीत इनरव्हील क्‍लबमार्फत पुढाकार घेणेत येईल अशी माहिती नूतन अध्यक्षा सौ उज्वला विरधे व पदाधिकारी यांनी दिली.

इनरव्हील क्लब सामाजिक, धार्मिक, आरोग्य क्षेत्रात काम करीत असलेल्या कामाचे कौतुक करीत सौ.सीमाताई परिचारक यांनी नूतन अध्यक्षा सौ. उज्वला विरधे व पदाधिकारी यांचा सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्या दिल्या. मावळत्या अध्यक्षा सौ शमिका केसकर यांनी मागील वर्षभरात केलेले कामाची माहिती सांगितली. यावेळी माधुरी जोशी व गौरी अंमळनेरकर यांनी सूत्रसंचालन केले.

यावेळी नगीना बोहरी, वैशाली काशीद आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. रा.पा.कटेकर, जयंत हरिदास, विवेक परदेशी, निकते सर, राजेंद्र केसकर आदि मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या. प्रसंगी गरजूंना महिन्याचे अन्नधान्य वाटप करणेत आले.

या कार्यक्रमासाठी मावळत्या अध्यक्षा शमिका केसकर, उपाध्यक्षा वैशाली काशीद, सचिव प्रीती वाघ, रश्मी कौलवार, जागृती खंडेलवाल, सुजाता यादगिरी, स्वानंदी काणे, सुजाता दोशी, साधना उत्पात, स्वाती हंकारे आदींनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here