(पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर यांची माहिती)
इंदापूर हद्दीत (१६ जानेवारी रोजी) बारामती बायपास येथे अचानक नाकाबंदी केली असता सदर नाका-बंदी दरम्यान एकूण चार पिकअप वाहनांमध्ये एकवीस जनावरे निर्दयपणे कोंडून व चारा पाण्याची सोय न करता कत्तलीसाठी वाहतूक करताना मिळून आल्याने जनावरांसह वाहने ताब्यात घेण्यात आली असून प्राण्यांना निर्दयपणे वागवणे व इतर कलमा सह गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
सदर कार्यवाही मध्ये चार पिकअप वाहने व जनावरे असा एकूण ३४ लाख ५ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल कार्यवाही दरम्यान जप्त करण्यात आला आहे.
सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय अधिकारी बारामती गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी. वाय. मुजावर, सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर धनवे, सहायक पोलिस निरीक्षक महेश माने, पोलीस उपनिरीक्षक सुधीर पाडुळे, सहा फौजदार सतीश ढवळे, सहा फौजदार काझी, पोलीस नाईक अमोल गायकवाड, पोलीस कॉन्स्टेबल रोहित यादव व होमगार्ड सूरज पोटफोडे यांनी केली आहे.