आ समाधान (दादा) आवताडे यांच्या वाढदिवसानिमित्त पंढरपूर मध्ये विविध कार्यक्रम संपन्न.

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

     

पंढरपूर-मंगळवेढा तालुक्याचे आमदार समाधान (दादा) आवताडे यांच्या वाढदिवसानिमित्ताने पंढरपूर शहर व पंढरपूर तालुक्यांमध्ये विविध कार्यक्रम आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमामध्ये आवताडे समर्थकांनी जोरदार कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे दिसून आले.   

    

२०/११/२०२१ रोजी रांझणी मध्ये आवताडे समर्थकांकडून भव्य रांगोळी स्पर्धा, वही पेन वाटप,  संगीत खुर्ची व प्रश्नमंजुषा अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन केले. छत्रपती उदयनराजे भोसले प्रतिष्ठान तर्फे शेखर (बंटी) भोसले यांनी पंढरपूर शहरामध्ये नेत्र तपासणी व मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिर आयोजन केले.आणि निराधार लोकांसाठी मिष्ठान्न भोजन दिले.       

२१/११/२०२१ रोजी विठ्ठल मंदिर नामदेव पायरी येथे विनोद लटके यांनी संजय (मालक) आवताडे यांच्या शुभ हस्ते महाआरती व वचनपूर्ती म्हणून १०० किलो पेढे वाटप केले. भाजपा शहर उपाध्यक्ष दीपक येळे यांनी गोपाळपूर येथे मातोश्री वृद्धाश्रम येथे संजय (मालक) आवताडे यांच्या शुभहस्ते मिष्ठान्न भोजन दिले. आमदार समाधान (दादा )आवताडे प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष प्रसाद (भैय्या) कळसे यांच्या वतीने निराधार मुलांना खाऊ वाटप, नवरंगे बालकाश्रम येथे अन्नधान्य वाटप,बेघर महिलांना साडी वाटप केले.  आबासाहेब पाटील व आप्पासाहेब जाधव यांच्याकडून पालवी संस्थेला फळे व खाऊ वाटप केले. शहाजी शिंदे यांच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप केले. शिवक्रांती संघटनेचे अध्यक्ष दत्ता काळे महाराज यांच्याकडून उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर येथे गरजू महिलांना फळे,पाणी बॉटल वाटप केले. मुंढेवाडी येथे आवताडे समर्थकाकडून शालेय वस्तू वाटप केले. अशाप्रकारे पंढरपूर शहर व तालुक्यामध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन नामवंत उद्योजक व आमदार साहेबांचे बंधु संजय (मालक) आवताडे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here