आ. समाधान आवताडे व आ. प्रशांत परिचारक यांनी आज घेतली उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांची भेट!

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

आ. समाधान आवताडे व आ. प्रशांत परिचारक यांनी आज घेतली उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांची भेट!

(विविध मागण्यांसाठी दोन्ही आमदारांनी दिले मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना निवेदन)

 

पंढरपूर सह पाच तालुक्यात लावण्यात आलेल्या संचारबंदी विरोधात पंढरपुरातील वातावरण संतप्त असताना आज संचारबंदीच्या निर्णयाचा फेरविचार करण्यासाठी आ.प्रशांत परिचारक व आ.समाधान आवताडे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट घेतली.आ.परिचारक यांनी पंढरपुरात लावण्यात आलेली संचारबंदी ही व्यापारी व जनतेवर अन्याय करणारी असून याआधी वर्षातील सर्व यात्रांवर बंदी घालल्याने पंढरपूरची अर्थव्यवस्था उध्वस्त झालेली आहे.आषाढी यात्रेत लावलेल्या संचारबंदी व सर्व नियमांचे पालन करीत जनता व व्यापारी यांनी प्रशासनास सहकार्य केले आहे. आता पंढरपूर शहरातील कोरोना संक्रमण नग्यण असून ग्रामीण भागात वाढणार्‍या रुग्णांमुळे पंढरपुरला निर्बधांचा त्रास सहन करावा लागत आहे.तरी सर्व जनता व व्यापारी यांचा विचार करुन आपण संचारबंदीच्या निर्णयाबाबत फेरविचार करावा,जसे पुणेशहर व ग्रामीण अशी विभागणी करुन पुणे शहराला निर्बधातून सुट दिली आहे तशीच सुट पंढरपूरला मिळावी अशी मागणी आ.परिचारक यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली. याबाबत व्यापारी व जनतेचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर हे पंढरपुरात येणार असून ते सर्व व्यापार्‍यां सोबत बैठक घेतील व त्यामध्ये या निर्णया बाबत विचार करण्यात येईल असे सांगण्यात आले. आ.प्रशांत परिचारक व आमदार समाधान आवताडे यांनी मुख्यमंत्र्यांना भेटण्यापुर्वी उपमुख्यमंत्री अजित पवारांनाही भेटले व त्यांना या प्रश्‍नात लक्ष घालण्याची विनंती केली. या प्रसंगी आ.रणजितसिंह मोहिते पाटील हे सुध्दा उपस्थित होते.

अत्यंत गडबडीत असतानाही आमदार परिचारक यांच्या विनंतीला मान देऊन मुख्यंमत्र्यांनी या बाबत आ.परिचारक व आ.आवताडे यांचेशी चर्चा केली. आ.प्रशांत परिचारक यांनी पंढरपूरात लावण्यात आलेल्या संचारबंदी उठविण्याबाबत थेट मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याने संचारबंदी बाबत तोडगा निघण्याची आशा निर्माण झाली आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here