आ. समाधान आवताडे व आ.प्रशांतराव परिचारक यांची जाधव कुटुंबीयांना सांत्वनपर भेट!

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

(एक लाख रुपयाची मदत केली जाहीर)

सोलापूर जिल्हा प्रतिनिधी

पंढरपूर तालुक्यातील मगरवाडी येथील शेतकरी स्वर्गीय सुरज जाधव यांनी काल महावितरणच्या त्रासाला कंटाळून विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी आज सोलापूर जिल्हा विधान परिषदेचे माजी आमदार प्रशांत परिचारक व पंढरपूर मंगळवेढा विधानसभेचे आमदार समाधान दादा अवताडे यांनी त्यांच्या निवास्थानी जाऊन सांत्वनपर भेट दिली.
यावेळी आमदार प्रशांतराव परिचारक यांनी सर्व उपस्थित पत्रकारांना माहिती देताना सांगितले की फक्त एक एकर शेती असताना हा तरुण शेतकरी धडपड करीत होता दुसऱ्याची शेती करून आपल्या कुटुंबाची उपजीविका करीत होता अत्यंत दुर्दैवी घटना असून एका बाजूला दुधाला दर नाही दुसऱ्या बाजूला विजेचा प्रश्न गंभीर होत चालला असून असे जर होत राहिले तर पंढरपूर तालुक्यात सारख्या सधन तालुक्यामध्ये, परिस्थिती खूप गंभीर होईल संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातच फक्त दोन तासांवर लाईट आली असल्याचे यावेळी बोलताना आमदार प्रशांतराव परिचारक यांनी सांगितले त्याच बरोबर येत्या सोमवारी अधिवेशनामध्ये, आमदार समाधान दादा अवताडे हे प्रश्न उपस्थित करणार असल्याचे यावेळी त्यांनी बोलताना आपले मत व्यक्त केले यावेळी स्व. सुरज जाधव याच्या वडिलांशी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी फोनद्वारे संवाद साधून त्यांचे सांत्वन केले.
यावेळी आ.समाधान दादा आवताडे, यांनी सांत्वनपर भेटीवेळी मीडियाला माहिती देतांना सांगितले की; या तरूण 24 वर्षाच्या शेतकऱ्याने असे पाऊल उचलायला नको होते एकीकडे विजेचा प्रश्न गंभीर होत चालला असताना अशा या तरुण शेतकऱ्याने आत्महत्या करणे हे योग्य नाही आम्ही विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये या महाविकास आघाडी सरकारला जाब विचारल्याशिवाय गप्प बसणार नसल्याचे यावेळी अवताडे यांनी सांगितले.

यावेळी माजी आमदार प्रशांतराव परिचारक यांनी पांडुरंग परिवाराच्या वतीने एक लाख रुपयाची मदत स्व. सूरज जाधव यांच्या कुटुंबियांना देण्याची यावेळी जाहीर केले.
यावेळी दोन्ही आमदारांच्या पुढे भागातील शेतकऱ्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here