आ.समाधान आवताडे व आ.प्रशांत परिचारक यांच्या पंढरपूर येथील एम.आय.डी.सी मंजूरी मागणीला खूप मोठे यश

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

 

 

भारताची दक्षिण काशी म्हणून नावलौकिक असणाऱ्या पंढरपूर येथील एम.आय.डी.सी.सारखा प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लावून येथील बेरोजगारी प्रश्न कायमस्वरूपी निकाली निघावा व येथील रोजगार संधी यांना उर्जितवस्था प्राप्त व्हावी यासाठी पंढरपूर – मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी आमदार समाधान आवताडे व जिल्ह्याचे आमदार प्रशांत परिचारक सदर एम.आय.डी. सी. मंजूर व्हावी यासाठी शासनदरबारी वेळोवेळी केलेल्या पाठपुराव्याला मोठे यश प्राप्त झाले आहे. या मंजुरी मागणीचे पत्र नुकतेच आमदार कार्यालयास प्राप्त झाल्याची माहिती आहे.

अध्यात्मिक आणि सांप्रदायिक परंपरेची देवभूमी अशी भूमी असलेल्या पंढरपूर तालुक्यातील औद्योगिक व धोरणात्मक विकासाचा अनुशेष भरून निघाला पाहिजे याकरिता आ. समाधान आवताडे व आ.प्रशांत परिचारक यांनी वेळोवेळी या मागणीसाठी केंद्र व राज्य पातळीवर आवश्यक गोष्टींचा पाठपुरावा करून व संबंधित खात्याचे मंत्री आणि अधिकारी यांना भेटून पत्रव्यवहार करून या मंजुरीसाठी रेटा लावला होता. अखेर या मागणीला खूप मोठे यश मिळून अनेक दिवसांपासून प्रलंबित असणारे हे स्वप्न साकार होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

अध्यात्मिक आणि सांप्रदायिक यांचा सुरेख संगम असणाऱ्या पंढरपूर शहरने हे संपूर्ण भारत देशात विठ्ठल भूमी म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे. भक्ती आणि मुक्ती यांची आराधका परमात्मा विठ्ठलापर्यंत वारीच्या रूपाने पोहचविण्यासाठी लाखो वारकरी भाविक पंढरपूर येथे येत असतात. चैत्री, आषाढी, कार्तिकी आणि माघी अशा प्रमुख चार वारीनिमित्त महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू आदी राज्यातून लाखोंचा भक्तीसागर पंढरीत जमा होतो. पंढरपूर शहर व शहराच्या आसपास कासेगाव, वाखरी, लक्ष्मी टाकळी व गोपाळपूर या निमशासकीय गावांची व पंढरपूर शहरची लोकसंख्या जवळपास २ लाखांच्या आसपास आहे. तसेच महाराष्ट्र राज्याच्या कानकोपऱ्याला व इतर राज्यांना जोडणारे अनेक राष्ट्रीय महामार्ग, रेल्वे मार्ग, विविध पालखी मार्ग आणि एस. टी मार्गांनी पंढरपूर शहर जोडले गेले असल्यामुळे सदर एम.आय.डी.सी प्रकल्प उभा राहिल्यास येथे उत्पादित होणाऱ्या पक्क्या मालासाठी कच्च्या मालाची मागणी व पुरवठा करणे सोयीस्कर ठरणार आहे. उपलब्ध दळणवळण सुविधेमुळे येथील निर्माण झालेल्या उत्पादनासही मोठ्या शहर बाजारपेठांमध्ये खूप मोठा उठाव मिळणार आहे.

शिवाय शैक्षणिकदृष्ट्या सुद्धा पंढरपूरने प्रगतीचा खूप मोठा मनोरा तयार केला आहे. आधुनिक युगात विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाचे मूलभूत ज्ञान अवगत व्हावे यासाठी पंढरपूर येथे ४ अभियांत्रिकी महाविद्यालये, व इतर उच्च शिक्षण देणाऱ्या विविध शैक्षणिक संस्थातून अनेक तरुण – तरुणी कौशल्यपूरक ज्ञान घेऊन आपले शिक्षण पूर्ण करतात. परंतु शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरी व रोजगार यांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी अनेकांना मोठ्या शहराकडे धाव घ्यावी लागत आहे. अशा पदवी संपादीत व इतर कौशल्यधारकांसाठी व्यवसाय व रोजगार संधी उपलब्ध होण्यासाठी पंढरपूर येथे एम.आय.डी.सी. प्रकल्प हे खूप मोठे दालन ठरणार असल्याची आहे. कोणत्याही तालुक्याच्या औद्योगिक विकासासास चालना देण्यासाठी एम. आय. डी. सी सारखे प्रकल्प होणे खूप आवश्यक आहे. त्यामुळे अशा विकासकार्यातून तालुक्याचा चेहरा – मोहरा बदलण्यासाठी मोठी बळकटी मिळणार असल्याचे आ. समाधान आवताडे व आ. प्रशांत परिचारक यांनी सांगितले आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here