आ. समाधान आवताडे व आ. प्रशांत परिचारक यांनी केलेल्या सफाई कामगारांच्या मागण्यांना  मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांचे कडून हिरवा कंदील

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

आ. समाधान आवताडे व आ. प्रशांत परिचारक यांनी केलेल्या सफाई कामगारांच्या मागण्यांना  मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांचे कडून हिरवा कंदील

सोलापूर // प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्यातील नगरपालिका व महानगरपालिका येथे कार्यरत असलेल्या अखिल भारतीय सफाई मजदूर शाखा पंढरपूर यांच्या वतीने ९ ऑगस्ट २०२१ रोजी राज्यस्तरीय एक दिवसीय काम बंद आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनाची दखल घेऊन आमदार समाधान आवताडे यांनी आंदोलन स्थळी भेट दिली, त्या प्रसंगी त्यांच्या मागण्यांचे निवेदन स्वीकारून लगेच या मागण्याचा पाठपुरावा करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री उद्धवजी ठाकरे साहेब यांना निवेदनाद्वारे या मागण्या मार्गी लावण्यासाठी समक्ष आमदार समाधान आवताडे व जिल्ह्याचे आमदार प्रशांतराव परिचारक यांनी भेट घेऊन सफाई कामगारांच्या मागण्या मार्गी लावण्यासाठी सविस्तर चर्चा करून निवेदन दिले होते.                                                     
या अनुषंगाने मुख्यमंत्री महोदयांनी आमदार आवताडे व आ.परिचारक यांच्या निवेदनाची दखल घेऊन नगर विकास विभाग कक्ष अधिकारी महाराष्ट्र शासन महेंद्र दळवी यांना आदेश दिले असता त्यांनी आयुक्त तथा संचालक नगरपरिषद प्रशासन संचालनालय व उपसचिव नगरविकास उपसचिव सामाजिक व विशेष सहाय्य विभाग या संबंधित विभागाकडे आपल्या स्तरावर कार्यवाहीचे आदेश दिले आहेत. अखिल भारतीय सफाई मजदूर संघटना यांच्या वतीने आमदार आवताडे व आमदार परिचारक यांना दिलेल्या मागण्यांच्या मुख्यमंत्री ठाकरे साहेबांनी हिरवा कंदील दिल्यामुळे महाराष्ट्र राज्यातील सर्व सफाई  कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here