आ. राम सातपुते आणि खासदार रणजितसिंह नाईक – निंबाळकर उद्या दाखल करणार उमेदवारी अर्ज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची राहणार प्रमुख उपस्थिती : भाजपा व महायुतीचे उद्या विजय संकल्प रॅलीद्वारे शक्ती प्रदर्शन

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

आ. राम सातपुते आणि खासदार रणजितसिंह नाईक – निंबाळकर उद्या दाखल करणार उमेदवारी अर्ज

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची राहणार प्रमुख उपस्थिती : भाजपा व महायुतीचे उद्या विजय संकल्प रॅलीद्वारे शक्ती प्रदर्शन

लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे सोलापूर लोकसभेचे उमेदवार आमदार राम सातपुते आणि माढा लोकसभेचे उमेदवार खासदार रणजितसिंह नाईक – निंबाळकर उद्या (मंगळवारी) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत सकाळी मिरवणुकीने अर्ज दाखल करणार आहेत. याकरिता जुना पुणे नाका येथील छत्रपती श्री संभाजी महाराज चौक येथून सकाळी १० वाजता भाजपा आणि महायुतीतर्फे विजय संकल्प रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्या मंगळवारी सकाळी सोलापुरात आगमन होणार आहे. त्यांच्यासमवेत भाजपा आणि महायुतीचे सोलापूर आणि माढा लोकसभेतील सर्व लोकप्रतिनिधी असणार आहेत. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांच्या मूर्तीला अभिवादन करून विजय संकल्प रॅलीचे उद्घाटन होईल. यानंतर छत्रपती श्री शिवाजी महाराज चौकातील हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराजांची मूर्ती, चार हुतात्मा चौक येथील सोलापूरच्या चार हुतात्म्यांचे पुतळे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा यांना अभिवादन करून ही विजय संकल्प रॅली जुना एम्प्लॉयमेंट चौक, व्हीआयपी रस्तामार्गे सात रस्ता येथे येणार आहे. या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा होणार आहे. भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या विजय संकल्प रॅलीला भाजपा तसेच महायुतीतील घटक पक्षातील सर्व लोकप्रतिनिधी, नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here