आ. मंगेश चव्हाण झाले ट्रक ड्रायव्हर, कन्नड घाटात पोलिसांनी केली पैश्यांची मागणी, मग पुढे काय झाले तुम्हीच पहा.

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

 

महावसुली आघाडी सरकारच्या आशिर्वादाने चाळीसगाव तालुक्यातील अवजड वाहनांसाठी बंद असलेल्या कन्नड घाटात महाराष्ट्र पोलीस ट्रक चालकांकडून कशा प्रकारे पैसे वसुली करतात याचा व्हिडीओ काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता, याची खातरजमा करण्यासाठी चाळीसगांव तालुक्याचे आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी वेषांतर करत स्टिंग ऑपरेशन केले. त्यांनी स्वतः अजवड ट्रक चालवत कन्नड घाटात नेला, त्याठिकाणी असलेल्या पोलिसांनी त्यांच्याकडे ५०० रुपयांची मागणी केली असता त्यांनी थोडे कमी करा अस सांगत ५०० रुपये पोलिसांच्या हातात दिले व बाकी पैसे परत मागितले असता सदर पोलिसाने ते देण्यास नकार दिला. नंतर ड्रायव्हर बनलेले आमदार मंगेश चव्हाण यांनी बाजूला उभ्या असलेल्या पोलिसांना जवळ बोलावले व हा बाकी पैसे परत देत नसल्याचे सांगितले, तेव्हा त्यातील एक पोलीस शिवीगाळ करायला लागला मग आमदार मंगेश चव्हाण यांनी खाली उतरून पोलिसांशी बोलायला सुरुवात करताच काही पोलिसांनी आमदारांना ओळखले व त्यांनी पळ काढला.

सचिन वाझे जेलमध्ये गेल्याने १०० कोटींचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी ठिकठिकाणी अश्या वसुल्या सुरु आहेत, एकीकडे चाळीसगाव तालुक्यात शेतकऱ्यांचे गुरे चोरीला जात असताना तिथे बंदोबस्त करायला पोलिसांना वेळ नाही, महावसुली आघाडी शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडत आहेत, १५ दिवसांपासून सुरु असलेल्या एसटी संपाकडे कानाडोळा करतात मात्र पोलिसांच्या मार्फत महावसुली जोरात सुरु आहे…

कन्नड घाटातील पोलिसांच्या वसुलीचा आमदार मंगेश चव्हाण यांनी केला पर्दाफाश, व्हिडीओ व्हायरल

दुरुस्तीसाठी अवजड वाहनांना प्रवेश बंद असलेल्या कन्नड घाटात पोलिसांकडून ५०० ते १००० रुपये प्रति अवजड वाहन घेऊन त्यांना सोडण्यात येते, यामुळे अनेकदा घाट जाम होऊन ५ ते १० तास घाट जाम होतो, गंभीर रुग्ण घेऊन जाणाऱ्या एम्ब्युलन्स तासंतास अडकून पडतात, यामुळे पूर्ण राज्यात चाळीसगाव तालुक्याचे नाव खराब होत आहे. केवळ वसुलीसाठी प्रवाश्यांच्या जीवाशी खेळाचा आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्याकडून स्टिंग ऑपरेशन करत पर्दाफाश केला गेला.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here