आ. भरतशेठ गोगावले यांना कोळी जमातीच्या लोकांनी घातला घेराव

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

आ. भरतशेठ गोगावले यांना कोळी जमातीच्या लोकांनी घातला घेराव

आदिवासी क्षेत्राच्या बाहेर राहणाऱ्या महादेव, मल्हार, टोकरे ,ढोर कोळी जमातीच्या लोकांना अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र सुलभ पद्धतीने मिळत नाही. ते मिळावे या मागणीसाठी शिवसेनेचे शिंदे गटाचे आमदार भरतशेठ गोगावले यांना पंढरपूर येथे कोळी जमातीच्या लोकांनी घेराव घातला आहे व घोषणा दिल्या.अशी माहिती महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी दिली

यावेळी रेस्टहाऊस येथे कोळी जमातीच्या शिष्टमंडळाला चर्चेसाठी त्यांनी बोलावले. त्यावेळी कोळी जमातीचे अभ्यासक प्रा. बाळासाहेब बळवंतराव यांनी आमदार भरतशेठ गोगावले यांना अनुसूचित जमातीच्या सवलतीस पात्र 45 जमातीची 2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात १ कोटी पाच लाख लोकसंख्या, ही लोकसंख्या गृहीत धरून 9.35% केंद्र व राज्य सरकार ट्रायबल डेव्हलपमेंट फंडची तरतूद केली जाते.या लोकसंख्येनुसार 9.35% प्रमाणे 25 आमदार व 4 खासदार निश्चित करून अनुसूचित जमातीच्या लोकांना राजकीय प्रतिनिधित्व दिले आहे. हे आमदार सातत्यानेआदिवासी क्षेत्रातूनच निवडून जातात. ते विशिष्ट जमातीचे असल्यामुळे आपल्या जमातीपुरताच संकुचित विचार करतात. त्यामुळे सातत्याने अनुसूचित क्षेत्राच्या बाहेर राहणाऱ्या सवलतीस पात्र 45 पैकी 33 जमातीच्या लोकांना यादीमध्ये असूनही सवलती पासून वंचित ठेवतात असा आरोप केला. आमदार खासदार निश्चित करताना तसेच 9.35% प्रमाणे फंडाची तरतूद करताना लोकसंख्या खरी असते आणि सवलती देताना मात्र ते खोटे आदिवासी कसे असतात असा प्रश्न उपस्थित केला

1901 ते 1941 या कालखंडात महाराष्ट्रात कोळी जमातीची पोट जातीचा उल्लेख करून जनगणना झाली नाही. महाराष्ट्रात सर्वांच्याच नोंदी कोळी या मातृ जमातीखाली झाल्या असल्याने 1950 पूर्वीची महादेव कोळी ची नोंद सापडत नाही. कोळी नोंदीवरून आदिवासी क्षेत्रातील कोळी जमातींना जात प्रमाणपत्र आणि वैधता प्रमाणपत्र सुलभ पद्धतीने दिले जात आहे. तोच निकष आदिवासी क्षेत्राच्या बाहेरील कोळी जमातीला लावून त्यांनाही जात प्रमाणपत्र आणि वैधता प्रमाणपत्र सुलभ पद्धतीने देण्यात यावे. अशी मागणी केली.

जिल्ह्यातील महादेव कोळी जमातीचे पुरावे असून सुद्धा प्रांताधिकारी गजानन गुरव जात प्रमाणपत्र सुलभ पद्धतीने देत नाहीत. त्यामुळे समाजावरती प्रचंड अन्याय होत आहे. तसेच सर्व पुरावे महादेव कोळी असताना सुद्धा एसबीसीची खोटी जात प्रमाणपत्रे घेण्यासाठी भाग पाडत आहेत. एखाद्या जमातीचा प्रवर्ग बदलण्याचा अधिकार प्रांताधिकार्‍यांना कोणी दिला. असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

यावर भरतशेठ गोगावले यांनी प्रांताधिकारी गुरव यांना योग्य पद्धतीने काम करण्याच्या सूचना दिल्या असून आगामी नागपूर हिवाळी अधिवेशनात कोळी जमातीचा प्रश्न सभागृहात उपस्थित करणार असल्याचे व कोळी .जमातीच्या शिष्टमंडळाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घालून सविस्तर चर्चेसाठी बोलवणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

यावेळी महर्षी,वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव ,नगरसेवक गणेश अधटराव, जिल्ह्यातील नेते लक्ष्मण धनवडे प्रा. बाळासाहेब बळवंतराव, पै. सिद्धनाथ कोरे, सुभाष अधटराव, अशोक अधटराव, दादा करकमकर, राहुल परचंडे अरविंद नाईकवाडी, संपत सर्जे,रवी नाईकवाडी माऊली भाऊ कोळी प्रकाश मगर चेतन नेहतराव इ उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here