आ. प्रणिती शिंदे यांच्या निधीतून 82 लाखाच्या विविध विकास कामांचा शुभारंभ

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

 

सोलापूर : सोलापूर शहरातील प्रभाग क्र. 09 मधील दाजी पेठ येथे रस्ते अत्यंत खराब अवस्थेत होते. यामुळे सदर भागातील नागरीक, विद्यार्थ्यांना ये-जा करण्याकरीता अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. तसेच सदर भागामध्ये घराजवळून विद्युत लाईन गेलेली आहे. त्यामुळे रहिवाश्यांच्या जिवीताला धोका निर्माण झालेला आहे. यामुळे सदर भागातील नागरीकांनी विद्युत वायर अंडरग्राऊंड करून करण्यात यावे इ. विविध समस्यांचे निवारण होण्याकरीता सदर भागातील नागरीकांनी आमदार प्रणिती शिंदे यांची भेट घेवून सदर समस्यांचे निवारण करण्याची मागणी केली होती. आमदार प्रणिती शिंदे यांनी तात्काळ आमदार स्थानिक विकास निधी सन 2021-22 व पायाभूत सोयी-सुविधा सन 2019-20 अंतर्गत 1) दत्त नगर ते पोलीस हेडक्वॉर्टर रस्ता करणे. (अंदाजित रक्कम 25 लाख), 2) दाजी पेठ परिसरात अंडरग्राऊंड केबल टाकणे. (अंदाजित रक्कम 10 लाख), 3) विजय नक्का घर ते आनंद बिर्रु घर रस्ता करणे. (अंदाजित रक्कम 20 लाख), 4) म्याकल घर ते कुमार कॅन्टीन रस्ता करणे. (अंदाजित रक्कम 10 लाख), 5) राम मंदिर ते मोहन मेडिका रस्ता करणे, (अंदाजित रक्कम 10 लाख), 6) पोशम्मा मंदिर जवळ फरशीकरण करणे. (अंदाजित रक्कम 7 लाख) हे विविध विकास काम मंजूर केले व त्याचे भुमिपूजन आमदार प्रणितीताई शिंदे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. त्यामुळे या भागातील नागरीकांनी त्यांचे मनापासून धन्यवाद दिले व आभार मानले.

यावेळी सोमपा गटनेते चेतन नरोटे, माजी नगरसेवक मेघनाथ येमूल, काशिनाथ गड्डम, शकुंतला साका, लक्ष्मीकांत साका, तिरुपती परकीपंडला, अमित श्रीराम, सुमित गडगी, विवेकानंद महिंद्रकर, सुनिल साका, दशरथ महिंद्रकर, सचिन धुमाळे, नरेंद्र उटगे, मनोहर कोडम, अनिल व्हनमाने, श्रीनिवास द्यावरकोंडा, चंद्रशेखर पेरमल, वासू दोरनाल, हरी सोमा, आनंद येमूल, महेश कोडम, सचिन महिंद्रकर, हरीश कोंडा, चंदू वंगारी, रमेश कोंडा, केशव पोलशेट्टी, संतोष पंतूलू, आप्पा गणपती प्रतिष्ठान, दाजी पेठचे सर्व पदाधिकारी व सदर भागातील बहुसंख्य युवक उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here