आ. प्रणिती शिंदे यांच्या आमदार निधीतून सोलापूर लोहमार्ग पोलीस ठाणे, सोलापूर येथे अत्याधुनिक संगणक संचाचे उद्घाटन

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

 

सोलापूर : सोलापूर शहरातील सोलापूर रेल्वे पोलीस स्टेशन येथे पोलीसांना त्यांची माहिती व त्यांच्या विविध कामाकरीता अत्याधुनिक संगणक संच नसल्यामुळे अनेक अडचणी निर्माण होत होती. सदर पोलीस स्टेशनातील पोलीसांनी आमदार प्रणिती शिंदे यांना भेटून संगणत व प्रिंटरची मागणी केलेली होती. आमदार प्रणिती शिंदे यांनी तात्काळ आमदार स्थानिक विकास निधी सन 2021 – 22 अंतर्गत सोलापूर लोहमार्ग पोलीस ठाणे, सोलापूर येथे 2 संगणक व 1 प्रिंटर देणे. (अंदाजित रक्कम 1.5 लक्ष) हे मंजूर केले व त्याचे उद्घाटन आमदार प्रणिती शिंदे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.

यावेळी DYSP प्रविण चौगुले, API अमोल गवळी, PSI शिवाजी शिंदे, PSI श्रीकांत वाघमारे, RPF, PI सतीश विधाते, RPF Crime सतीश कांबळे, सहाय्यक पोलीस फौजदार संजय जाधव, नगरसेवक विनोद भोसले, बाबा करगुळे, सुनिल कांबळे, रेणुका चव्हाण, माने, धंगेकर, बालाजी जाधव, पवन गायकवाड आदि. उपस्थित होते.

 

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here