आ. प्रणिती शिंदे यांचा एल्गार, महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकविणारच, पदाधिकारी कार्यकर्त्यांना उद्देशून म्हणाल्या “कर हर मैदान फतेह” म्हणून कामाला लागण्याचे आवाहन केले.
आगामी सोलापूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक तयारी संदर्भात सोलापूर शहर कॉंग्रेस कमिटी ब्लॉक, फ्रंटल सेल पदाधिकाऱ्यांची बैठक महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी कार्याध्यक्षा आमदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शहर अध्यक्ष प्रकाश वाले, विशेष उपस्थिती जेष्ठ नेते सुधीर खरटमल, गटनेते चेतनभाऊ नरोटे, कार्याध्यक्ष संजय हेमगड्डी, मनोज यलगुलवार, माजी महापौर U.N. बेरिया यांच्या प्रमुख उपस्थितीत हॉटेल लोटस येथे संपन्न झाली.
या बैठकीस जेष्ठ नगरसेवक शिवा बाटलीवाला, रियाज हुंडेकरी, नरसिंग कोळी, विनोद भोसले, तौफिक हत्तुरे, प्रवीण निकाळजे, स्थापत्य समिती सभापती अनुराधा काटकर, नगरसेविका परवीन इनामदार, फिरदोस पटेल, वैष्णवीताई करगुळे, ब्लॉक अध्यक्ष अरुण साठे, देवाभाऊ गायकवाड, बाबुराव म्हेत्रे, लक्ष्मीकांत साका, उदयशंकर चाकोते, सरचिटणीस मनीष गडदे, युवक अध्यक्ष अंबादास बाबा करगुळे, NSUI जिल्हा अध्यक्ष गणेश डोंगरे, भटक्या विमुक्त विभाग अध्यक्ष भारत जाधव, परिवहन सदस्य तिरुपती परकीपंडला, सेवादल अध्यक्ष भीमाशंकर टेकाळे, उदयोग वाणिज्य सेलचे पशुपती माशाळ, भटक्या विमुक्त युवक अध्यक्ष पवन गायकवाड, कामगार सेलचे सायमन गट्टू, श्रद्धा आबुटे, प्रियांका डोंगरे, यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार प्रणिती शिंदे पदाधिकारयासमोर केलेल्या आवेशपूर्ण म्हणाल्या की, येत्या काही महिन्यात सोलापूर महानगरपालिकेची निवडणूक लागणार असून महापालिका निवडणूक ही कार्यकर्त्यांची निवडणूक असते कॉंग्रेस पक्ष, मी आणि आम्ही सर्वजण संपुर्ण ताकदीने पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार असून सोलापूर महापालिकेवर कॉंग्रेस पक्षाचा झेंडा फडकाविणारच या दृष्टीने तयारीला लागण्याचे आवाहन केले. पदाधिकारी कार्यकर्त्यांना उद्देशून “कर हर मैदान फतेह” म्हणत प्रत्येक वार्डाची लढाई जिंकणारच अशी तयारी करत असल्याचे आमदार प्रणिती शिंदे यांनी संगीतले.
यावेळी विशेष उपस्थिती असलेल्या काँग्रेसचे जेष्ठ नेते सुधीर खरटमल म्हणाले की, मी कुठेही गेलो नाही मी सुशीलकुमार शिंदे आणि काँग्रेसचा सच्चा सेवक असून आगामी महापालिका निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी हर तऱ्हेने प्रयत्न करून महापालिकेवर तिरंगा फडकविणार असल्याचे सांगितले.
यावेळी सुधीर खरटमल, गटनेते चेतनभाऊ नरोटे, कार्याध्यक्ष संजय गेमगड्डी, U.N. बेरिया, आणि नगरसेवक पदाधिकाऱयांनी आपले विचार व्यक्त केक तर आभार शहर अध्यक्ष प्रकाश वाले यांनी मानले.