आ. प्रणिती ताई शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडरच्या दरवाढीविरोधात सोलापूर शहर जिल्हा विद्यार्थी काँग्रेस NSUIच्या वतीने बोंबाबोंब आंदोलन

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

आ. प्रणिती ताई शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडरच्या दरवाढीविरोधात सोलापूर शहर जिल्हा विद्यार्थी काँग्रेस NSUIच्या वतीने बोंबाबोंब आंदोलन

 

सोलापूर विद्यार्थी काँग्रेस NSUI तर्फे पेट्रोल, डिझेल व गॅस दरवाढीच्या तसेच महागाईच्या विरोधात महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कार्याध्यक्षा आमदार प्रणिती ताई शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र प्रदेश विद्यार्थी कॉंग्रेस अध्यक्ष आमिर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली व सोलापूर विद्यार्थी काँग्रेस अध्यक्ष गणेश डोंगरे यांच्या वतीने “बोंबाबोंब आंदोलन” करून डफरीन चौक येथील सुपर पेट्रोल पाच मिनिटे पेट्रोल पंप बंद करून मोदी सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात आले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुखवटा तयार करून त्यांच्या गळ्यात अमित शहा,अदानी-अंबानी,बाबा रामदेव यांचे मुखवट्याचा हार घालून मोदींच्या हातात एक पिशवी देऊन सामान्य जनतेचा पैसा पेट्रोल, डिझेल,गॅस व जीवनाश्यक वस्तू महागाई करून कशाप्रकारे मोदी सरकार लुटत आहे हे पेट्रोलपंपावर दाखवून बोंबाबोंब आंदोलन मोठ्या प्रमाणात करण्यात आले.
*आंदोलनात आमदार प्रणिती ताई शिंदे म्हणाल्या कोरोनाच्या महासंकटामध्ये पेट्रोल,डिझेल,गॅस व जीवनाश्यक वस्तू दरवाढी करणे मोदी सरकारसाठी लज्जास्पद आहे.सर्वसामान्य जनता महागाई मध्ये होरपळून जात आहे. हि महागाई जो पर्यंत थांबणार तोपर्यंत प्रत्येक पेट्रोलपंप आंदोलन चालू राहतील असा इशारा मोदी सरकारला देण्यात आला.
यावेळी सोलापूर विद्यार्थी काँग्रेस अध्यक्ष गणेश डोंगरे,सोलापूर शहर काँग्रेस कार्याध्यक्ष मनोज यलगुलवार,नगरसेवक विनोद भोसले,ब्लाॅक अध्यक्ष देवा गायकवाड,सोशल मिडिया अध्यक्ष तिरूपती परकिपंडला व विद्यार्थी काँग्रेस पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here