भटक्या समाजातील लोकांना नक्कीच न्याय मिळवून देणार: आ.पठळकर

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

भटक्या समाजातील लोकांना नक्कीच न्याय मिळवून देणार: आ.पठळकर

(आ.गोपीचंद पडळकर यांचे भाजपाचे तालुकाध्यक्ष सुनील चव्हाण यांच्या हस्ते स्वागत)

 

राज्यातील गोरगरीब मेंढपाळ वंचित समाज घटकातील लोकांच्या मूलभुत प्रश्न व आडचणी समजून घेऊन ते सोडविण्यासाठी आ.गोपीचंद पडळकर यांनी ओबीसी,भटक्या विमुक्त जाती, जमाती व धनगर आरक्षण लागू व्हावे यासाठी राज्यभर घोंगडी बैठकीचे दौरे सुरू केले आहे

या बैठकीत मोहोळ तालूक्यातील पेनूर व आष्टी गावात नंदीवाले,गाडीवाले,रामोशी या समाजासाठी राज्य शासनाने न्याय द्यावा अशी भुमिका मांडली

आ.पडळकर बोलताना म्हणाले की,केवळ कागदी घोडे नाचवण्यासाठी शासनाला पुरावे म्हणून जन्म मृत्यूचे दाखले पाहिजे असतील,पण या भटक्या लोकांनी द्यायचे कसे? आसुडाचे फटके मारल्याशिवाय सरकार जाग्यावर येणार नाही पेनूर येथील मरिआई,गाडीवाले,समाजाला पेनूर शिवारात शासनाची असणारी जमीन कशी देता येईल त्यासाठी पाठपुरावा करू,असेही आ.पडळकर यांनी सांगितले.

यावेळी आ.गोपीचंद पडळकर यांचे स्वागत करताना मोहोळ तालुक्यामध्ये तालुकाध्यक्ष सुनील दादा चव्हाण, माऊली हळणवर,सुशील क्षीरसागर, भाजपाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here