आषाढीच्या पार्श्वभूमिवर श्री विठ्ठल मंदीरात दररोज स्वच्छता..!

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

आषाढीच्या पार्श्वभूमिवर श्री विठ्ठल मंदीरात दररोज स्वच्छता..!

सोलापुर // प्रतिनिधी

आषाढी यात्रेच्या निमित्ताने पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात स्वच्छतेच्या कामाला सुरुवात झाली आहे. दररोज दिवसातून तीन वेळा मंदिरात सॅनिटायझरची फवारणी करून स्वच्छ केले जाते.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विठ्ठल मंदिर मागील काही महिन्यांपासून दर्शनासाठी बंद आहे. येत्या 20 जुलै रोजी आषाढी एकादशीच्या निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सपत्नीक विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा होणार आहे. या पार्श्वभूमीवर विठ्ठल मंदिर समितीने संपूर्ण मंदिराची स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे.

आषाढी एकादशीच्या सोहळा पर्यंत मंदिराची दररोज तीन वेळा स्वच्छता करण्यात येणार आहे. विठ्ठल रुक्मिणीचा गाभारा दिवसातून तीन वेळा स्वच्छ करून सॅनिटायझर फवारणी केली जाते. याशिवाय सोळखांबी व सभामंडपात ही कर्मचाऱ्यांकडून स्वच्छता केली जात आहे. एकादशीच्या निमित्ताने काही मोजक्या भाविकांना विठ्ठल दर्शनासाठी मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे. 

या वेळी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही याची ही खबरदारी मंदिर समितीने घेतली आहे. आषाढी एकादशीच्या मुख्यमंत्र्यांच्या महापूजा वेळी उपस्थित राहणाऱ्या पदाधिकारी , अधिकाऱी व मंदिरातील कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी केली जाणार असल्याची माहिती मंदिर समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी दिली.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here