आषाढीची महापूजा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच करणार, निवडणूक आयोगाचा हिरवा कंदील

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

पंढरपूर: यांच्या पंढरपूर दौऱ्याला निवडणूक आयोगाने हिरवा कंदील दिला आहे. त्यामुळे अखेर आषाढी एकादशीला विठ्ठलाची महापूजा ही एकनाथ शिंदेंच्या हस्तेच होणार हे निश्चित झालं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते रविवारी पहाटे विठ्ठलाची शासकीय महापूजा पार पडणार आहे. आषाढी एकादशीच्या सोहळ्यासाठी उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पंढरपूर दौऱ्यावर येत आहेत. मात्र, राज्यात नगरपालिका निवडणूक जाहीर झाल्याने आचारसंहिता लागू झाली असून मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्यासाठी जिल्हा प्रशासनाने राज्य निवडणूक आयोगाकडे परवानगी मागितली होती. त्या विनंतीली निवडणूक आयोगाने परवानगी दिलीये. मात्र तीन अटींसह ती परवानगी देण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांच्या सहा कार्यक्रमांना या अटींसह परवानगी देण्यात आली आहे. हेही वाचा – १. पूर्वनियोजित शासकीय कार्यक्रमांमध्ये कोणत्याही निधी विकास योजना, कार्यक्रमांची घोषणा करू नये. २. वरील सर्व कार्यक्रमांसाठी आवश्यक त्या नियमानुसार परवानग्या घेण्यात याव्यात. ३. कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यास हरकत नाही, पण त्या ठिकाणीही उपरोक्त अटींचे पालन करण्यात यावे. हेही वाचा – विश्रामगृह येथे पर्यावरणाची वारी, पंढरीच्या दारी याचा समारोप सोहळा होणार आहे. एकादशीच्या दिवशी पहाटे शासकीय महापूजा झाल्यावर पहाटे इस्कॉन आंतरराष्ट्रीय मंदिराचा भूमिपूजन कार्यक्रम होणार आहे. तसंच सकाळी ११ वाजता सुंदर माझे कार्यालय, स्वच्छता दिंडी समारोप आणि दुपारी मुख्यमंत्री शिंदे हे शिवसेना पक्षाच्या मेळाव्यास हजेरी लावणार आहेत.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here