आश्वासनांची आतषबाजी करून ठाकरे सरकारने शेतकऱ्याची फसवणूक केली :- आ. प्रशांत परिचारक

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

 

सोलापूर // प्रतिनिधी

अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची पिके पाण्यात गेली आहे. तसेच सप्टेंबर महिन्यात क्विंटलला ११ हजारापर्यंत मिळणारा भाव आता चार ते पाच हजारांपर्यंत घसरल्याने शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान होत आहे. शेतकऱ्याने माल बाजारात आणणे थांबविल्याने आवकही थंडावली आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या हाती पैसा नसल्याने शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाणार आहे. यामुळे ठाकरे सरकारला जरादेखील लाज असेल, तर यंदाची दिवाळी शेतकऱ्याच्या दुःखाची दिवाळी म्हणून जाहीर करून मातोश्री व वर्षावर रोषणाई न करण्याचे जाहीर करावे असे आवाहन आ. प्रशांत परिचारक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केले आहे.

ठाकरे सरकारच्या शेतकरी द्वेषामुळे राज्यातील हजारो शेतकरी कुटुंबांच्या घरात ऐन दिवाळीत अंधार पसरला असून शेतकऱ्याची दिवाळी काळी करण्यास ठाकरे सरकारचा नाकर्तेपणा कारणीभूत आहे. वारेमाप आश्वासने व घोषणांचा पाऊस पाडून एकही घोषणा कृतीत न आणणाऱ्या ठाकरे सरकारने आमच्या प्रश्नांची जाहीर उत्तरे द्यावीत, अन्यथा जनतेची व शेतकऱ्याची फसवणूक केल्याप्रकरणी सपशेल माफी मागावी,

पंढरपूर येथे राष्ट्रिय महामर्गाच्या रस्त्यांच्या कामाच्या भूमिपूजनासाठी राष्ट्रिय महामार्ग मंत्री नितीन गडकरी येणार आहेत. या विषयी माहिती देण्यासाठी भाजपचे आ. प्रशांत परिचारक यांनी पत्रकार परिषद घेतली होती. या प्रसंगी त्यांनी महविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. यावेळी भाजपाचे जिल्हा अध्यक्ष श्रीकांत देशमुख उपस्थित होते.

पुढे परिचारक म्हणाले, राज्यातील ५५ लाख हेक्टरहून अधिक शेतजमिनींवरील पिकांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाल्याची सरकारची प्राथमिक आकडेवारी आहे. प्रत्यक्षात १०० लाख हेक्टरहून अधिक जमिनीवरील पिके पूर्ण नष्ट झाली आहेत, आणि पुरामुळे शेतजमिनी नापीक झाल्या आहेत. जमिनीचा कस संपल्यामुळे पुढील दहा वर्षे तरी कोणत्याही पिकाची शाश्वती राहिलेली नाही, आणि ठाकरे सरकार हेक्टरी दहा हजार रुपयांच्या फसव्या मदतीची पाने पुसून शेतकऱ्याची थट्टा करत आहे. जाहीर केलेल्या मदतीपैकी फुटकी कवडीदेखील शेतकऱ्यापर्यंत पोहोचलेली नसल्याने राज्यातील शेतकरी नैराश्यग्रस्त झाला आहे. यातून आत्महत्यांचे प्रमाण वाढत असल्याने ठाकरे सरकार म्हणजे शेतकऱ्यांचे बळी घेणारे सरकार ठरले आहे. या दुःखामुळे हजारो शेतकरी कुटुंबांची दिवाळी अंधारात जाणार असून, मातोश्री वर्षा आणि मंत्रालय मात्र रोषणाईने उजळणार आहे. ठाकरे सरकारला जरादेखील लाज असेल, तर यंदाची दिवाळी शेतकऱ्याच्या दुःखाची दिवाळी म्हणून जाहीर करून मातोश्री व वर्षावर रोषणाई न करण्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर करावे असे ते यावेळी,म्हणाले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here