आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डेटा सायन्स काळाची गरज

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

सध्याच्या स्पर्धेच्या युगामध्ये उद्योग क्षेत्रातील अनेक मोठया शहरामध्ये विद्यार्थ्यांच्या बुध्दीच्या विकासाकरीता अधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्याच्या दृष्टीने  अभ्यासक्रमामध्ये आमुलाग्र बदल होत आहेत. अखिल भारतीय तंत्रशिक्षण  परिषदेने  आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डेटा सायन्स सारख्या नवीन अभ्यासक्रमाचा समावेश  केला आहे. या अभ्यासक्रमाचा वापर येणाऱ्या पुढील काळासाठी खुप मोठया प्रमाणावर होणार आहे. त्याअनुषंगाने या क्षेत्रामध्ये मोठया प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत.

यालेखामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डेटा सायन्स याबद्दलची माहिती थोडक्यात जाणून घेऊयात-

  आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (एआय)  म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता. आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा अर्थ असा होतो की, जी मनुष्यामध्ये विचार करण्याची क्षमता किंवा शक्ती असते किंवा बुद्धिमत्ता असते. ती बुद्धिमत्ता व निर्णय घेण्याची क्षमता एका मशीनमध्ये बसवणे किंवा फिट करणे ही बुद्धिमत्ता आपण एका सॉफ्टवेअर किंवा प्रोग्रॅमच्या मदतीने त्या मशीनमध्ये फिट करू शकतो. आपल्या आयुष्यात अनेक समस्या येत असतात आपण आपल्या बुद्धिमतेनुसार आपल्या निर्णय क्षमतेनुसार निर्णय घेतो व त्या समस्येचे   समाधान शोधतो. पण कॉम्प्युटर किंवा कुठल्याही मशीनला माणसाने कमांड द्यावी लागते तरच त्यांची प्रोसेस चालू होते. आपल्याला जे काम संगणकावर करायचे आहे तशी कमांड आपण देत जातो आणि संगणक त्याच काम करत जातो. पण आर्टिफिशिअल इंटेलिजन्स कृत्रिम बुद्धिमतेमध्ये मशीन स्वतःहून निर्णय घेते. आपल्या बुद्धिमतेनुसार कमांड तयार करते की पुढे काम काय व कसे करायचे आहे ही मशीन मधील कृत्रिम बुद्धिमत्ता मानव निर्मित असते.

          आर्टिफिशिअल इंटेलिजन्स तयार करण्यासाठी मानवाने खूप काही संशोधन केले. हया आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा शोध मानवाने अशा  प्रकारे केला आहे की, कोणत्याही निर्णयाक ठिकाणी सॉफ्टवेअर किंवा प्रोग्रॅमद्वारे बनवलेल्या बुद्धिमतेने मशीन योग्य तो निर्णय घेईल. या मशिन्स आपल्या भावना विचारांची मनुष्यासोबत देवाण घेवाण करून योग्य निर्णय घेतात. आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा वापर सध्या कारमध्ये देखील केला जातो. आर्टिफिशिअल इंटेलिजन्सने सेल्फ ड्रायव्हिंग कार देखील मानवाने बनवलेली आहे. या सेल्फ ड्रायव्हिंग कारमध्ये काही सेन्सर्स देखील बसवले गेले आहेत. या विविध सेन्सर्स द्वारे ही कार स्वतः चालते, स्वतः वळते, रास्ता स्वतःहुन पार करते व कार मध्ये बसवलेल्या जीपीएस  द्वारे ती कार कोठे पोहोचणार आहे हे देखील त्यात सेव्ह असते. त्यामुळे आपल्या निश्चित डेस्टिनेशनवर ही कार जाऊन पोहोचते. या कार मध्ये जे सेन्सर्स बसवलेले  असतात, त्यांच्यापासून या कारला समजते की आपल्या आजूबाजूला कोणती गाडी आहे, ती किती अंतरावर आहे, कुठे सिग्नल लागला आहे, कुठे थांबायचे आहे, सिग्नल हिरवा झाल्यावर परत कार आपोआप चालू होते.

    आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (एआय) हा फक्त एक शब्द नसून हा एक बदल आहे. ह्या तंत्रज्ञानामुळे भविष्यात जगाचे रूप बदलणार आहे. येणारे २१ वे शतक हे फक्त आर्टिफिशिअल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाचे लक्षात ठेवले जाईल. कारण तेव्हा ह्याचा वापर प्रत्येक क्षेत्रात करून अनेक क्षेत्र विकसित होऊ शकतात. जेव्हापासून मशीनची कल्पना अस्तित्वात आली तेव्हापासून एआयने लोकांच्या जीवनावर महत्त्वपूर्ण प्रभाव पाडला आहे. आज, मशीन्स तोंडी आदेश समजतात, चित्रे ओळखतात, कार चालवितात, गेम्स खेळतात आणि मानवांच्या कार्यपद्धतीपेक्षा बरेच काही चांगले काम करतात. एआय तंत्रज्ञानाद्वारे कोणतीही मशीन मनुष्या सारखे स्वतः डोकं वापरून काम करू शकते. जसे की भाषा ओळखणे, विविध भाषेत बोलणे, आवाज ओळखणे, काम करणे, एकमेकांशी संवाद साधणे, इत्यादी गोष्टी करू शकते. एआय ही जगभरात प्रसिद्ध असलेली टेक्नॉलॉजी आहे. एआय म्हणजे मानवी बुद्धिमत्ते सारखे शिकण्याची  क्षमता मशीन्समध्ये व त्या मशीन मधल्या सॉफ्टवेअर प्रोग्रॅम्समध्ये तयार करण्यासाठी वापरले जाणारे तंत्रज्ञान.

कृत्रिम बुद्धिमत्तेचे फायदे:-

मोठमोठ्या कंपन्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या आधारे आधुनिक कार बनवत आहेत, ज्या ड्रायव्हरशिवाय असतील, त्या एआय तंत्रज्ञानाचा वापर करून स्वयंचलितपणे चालवल्या जातील. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने पर्यावरण आणि हवामान बदलाचा अंदाज घेऊन आपत्ती टाळता येऊ शकते. कृत्रिम बुद्धिमत्ता कोणत्याही प्रकारच्या नैसर्गिक किंवा मानवनिर्मित शारीरिक नुकसान किंवा आपत्तींमध्ये प्रभावीपणे वापरली जाऊ शकते. याद्वारे दळणवळण, संरक्षण, आरोग्य इत्यादी क्षेत्रात उत्कृष्ट काम करता येईल. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून रस्ते अपघातही टाळता येतात.

एआय चा वापर कोणत्या क्षेत्रात केला जातो-

व्यवसाय, अर्थव्यवस्था, विमानचालन, संरक्षण क्षेत्रे, शिक्षण आरोग्य सेवा, संगणक दृष्टी, संगणक गेमिंग, बुद्धिमान रोबोट, नैसर्गिक भाषा, हवामान अंदाज उत्पादन इ.

डेटा

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here