आम आदमीने रस्त्यावर पेटवली चूल ; गॅस दरवाढीचा तीव्र शब्दात निषेध नोंदवण्यात आला.

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

केंद्र सरकारने गॅस सिलेंडर मागे पन्नास रुपये दरवाढ केल्याच्या निषेधार्थ आम आदमी पार्टी सोलापूरच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय समोर चूल पेटवून भाकरी करण्यात येऊन या गॅस दरवाढीचा तीव्र शब्दात निषेध नोंदवण्यात आला.

गॅस दरवाढ रद्द झालीच पाहिजे, मोदी सरकार मुर्दाबाद, मोदी ‘तेरी तानाशाही नहीं चलेगी, भ्रष्टाचार का एक ही काल केजरीवाल केजरीवाल अशी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

महिला पदाधिकारी अश्विनी गायकवाड म्हणाल्या, 100 रुपयात उज्वला गॅस कनेक्शन दिले मात्र एका गॅस मागे बाराशे रुपये मोदी सरकार घेत आहे. या सरकारला लाज वाटत नाही का? गॅस दरवाढी विरोधात आंदोलन करणाऱ्या स्मृती इराणी यांनी आता लाज सोडली का? ही दरवाढ तात्काळ रद्द झाली पाहिजे अन्यथा आम आदमी पार्टी पेटून उठेल असा इशारा दिला.

संघटक सागर पाटील म्हणाले, एका गॅस सिलेंडरला बाराशे रुपये सर्वसामान्य माणूस कसा देऊ शकतो. महागाई कमी करू म्हणून सत्तेत आलेल्या मोदी सरकारने महागाई वाढवून सर्वसामान्यांच्या गळ्यावर पाय दिला आहे. आता जनतेला चुलीवर स्वयंपाक करण्याशिवाय पर्याय नाही त्याची दाहकता दाखवण्यासाठी आम आदमी पक्षाच्या वतीने आज आंदोलन करण्यात आले आहे. ही दरवाढ त्वरित मागे घ्यावी अशी मागणी केली.

या आंदोलनात प्राजक्त चांदणे, जुबेर हिरापुरे, आनंद जाधव, गौतम सोनटक्के, हुसेन बागवान, एम आय गब्बूरे, जफार मदनी, अश्विनी गायकवाड, सुचित्रा वाघमारे, भारत अली, जैनुद्दीन शेख, अल्ताफ तांबोळी, निलेश संगेपाग यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here