आमदार स्थानिक विकास निधी माढा मतदारसंघातील कामांसाठी 1 कोटी 5 लाखाचा निधी मंजूर:-आ.बबनदादा शिंदे

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

आमदार स्थानिक विकास निधी माढा मतदारसंघातील कामांसाठी 1 कोटी 5 लाखाचा निधी मंजूर:-आ.बबनदादा शिंदे

माढा मतदारसंघात सामाविष्ठ माढा पंढरपूर व माळशिरस तालुक्यातील गावांसाठी आमदार स्थानिक विकास निधीतून सन 2023-24 कार्यक्रमाअंतर्गत व्यायामशाळा, सभामंडप व सामाजिक सभागृह ,पाणी पुरवठा पाईपलाईन, आर.ओ.प्लॅन्ट, शाळांना संगणक संच यासाठी रक्कम रु. 1 कोटी 5 लाखाचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती आ.बबनराव शिंदे यांनी दिली

अधिक माहीती देताना आ.शिंदे म्हणाले माढा मतदारसंघात समाविष्ठ माढा,पंढरपूर व माळशिरस तालुक्यातील गावांसाठी आमदार स्थानिक विकास निधी अंतर्गत कामे सुचविण्यात आली होती. त्यानुसार सन 2023-24 कार्यक्रमाअतंर्गत माढा तालुक्यातील 1) अरण येथील 1. जि.प.प्राथ.शाळा येथे 7 संगणक संच देणे.रु. 4.90 लाख, 2. श्री.संत सावता माळी विद्यालय येथे 7 संगणक संच देणे.- 4.90 लाख, 2) अंजनगांव (उ) येथील अंबाबाई मंदिरासमोर सभामंडप बांधणे.-रु. 10 लाख, 3) चिंचोली येथील नागोबा मंदिर सभामंडप दुरुस्ती करणे.- रु.5 लाख. 4) शिराळ (मा) येथे सामाजिक सभागृह बांधणे.रु. 15 लाख, 5) उपळाई (बु) येथील 1. आखाडे वस्ती येथे महादेव मंदिरासमोर सभामंडप बांधणे. रु. 7 लाख, 2. उपळाई (बु) येथील आण्णाभाऊ साठे येथे समाज मंदिर बांधणे.रु.7 लाख, 6) खैराव येथील स्मशानभूमी येथे बोअरवेल पंप व पाईपलाईन करणे. रु. 5 लाख. तसेच पंढरपूर तालुक्यातील 1) करकंब येथील नृसिंह मंदिरासमोर सभामडप बांधणे. रु.10 लाख, 2) करोळे येथे स्मशानभूमी काँक्रीटीकरण करणे. रु. 10 लाख, 3) बाभूळगांव येथील श्री.संत सावता माळी मंदिरासमोर सभामंडप बांधणे. रु. 7 लाख, 4) सांगवी येथील दलित वस्ती येथे व्यायामशाळा बांधणे.रु. 7 लाख, तसेच माळशिरस तालुक्यातील 1) वाघोली येथील शेंडगे वस्ती लक्ष्मी मंदिरासमोर सभामंडप बांधणे. रु. 10 लाख, 2) जांबुड येथील सेक्शन नं. 15 येथे आर.ओ.प्लॅन्ट बसविणे. रु. 3 लाख. अशा प्रकारे एकुण 1 कोटी 5 लाखाचा निधी मंजूर झाला असून लवकरच निविदा प्रक्रिया राबविली जाऊन कामास सुरुवात होणार असल्याची माहिती आ.शिंदे यांनी दिली.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here