आमदार राम सातपुते यांना खासदार करण्यासाठी भीमा परिवार उचलणार सिंहाचा वाटा खासदार धनंजय महाडिक : भीमा परिवाराचा विजय संकल्प कार्यकर्ता संवाद मेळावा उत्साहात

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

आमदार राम सातपुते यांना खासदार करण्यासाठी भीमा परिवार उचलणार सिंहाचा वाटा

खासदार धनंजय महाडिक : भीमा परिवाराचा विजय संकल्प कार्यकर्ता संवाद मेळावा उत्साहात

विकासाचा ध्यास घेतलेले आता राम सातपुते यांना सोलापूर लोकसभेचे खासदार करण्यासाठी भीमा परिवार सिंहाचा वाटा उचलणार आहे असा निर्धार भीमा परिवाराचे प्रमुख खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केला.

भाजपा आणि महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ मोहोळ तालुक्यातील टाकळी सिकंदर येथे शुक्रवारी भीमा परिवारातर्फे विजय संकल्प कार्यकर्ता संवाद मेळावा उत्साहात झाला. यावेळी भीमा परिवाराचे प्रमुख खासदार धनंजय महाडिक यांनी मार्गदर्शन केले. यावेळी भाजप आणि महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी व्यासपीठावर भीमा सहकारी साखर कारखान्याचे मार्गदर्शक खासदार धनंजय महाडिक, भीमा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विश्वराज महाडिक, पुळुजचे सरपंच विश्वास महाडिक, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील, चरणराज चवरे, सुशील क्षीरसागर, विधानसभा निवडणूक प्रमुख रमेश माने, भाजपाचे मोहोळ तालुका अध्यक्ष सुनील चव्हाण, सतिश काळे, शंकरराव वाघमारे, भाजपा पंढरपूर शहराध्यक्ष विक्रम शिरसट, रयत क्रांती शेतकरी संघटनेचे छगन पवार उपस्थित होते.

खासदार धनंजय महाडिक म्हणाले, सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजपा व मित्रपक्षाचे उमेदवार आमदार राम सातपुते यांना भीमाच्या कार्यक्षेत्रातुन मोठे मताधिक्य आम्ही मिळून देऊ. राम सातपुते व मी मिळून केंद्रातील मोठा निधी आणून सोलापुरातील विमानतळाचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावू.

भाजप व महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते म्हणाले, जनतेचे प्रश्न सोडवण्यास प्राधान्य देणारा मी कार्यकर्ता आहे. माळशिरस तालुक्यामध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली विकासाचे जाळे विणण्याचा प्रयत्न केला आहे. आगामी काळात सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतीचा, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, ग्रामीण भागातील रस्त्यांचे प्रश्न, वीजेचे प्रश्न सोडविण्यास प्राधान्य राहणार आहे. सोलापूरकर जिल्ह्यातील मतदारांनी मोदींचे हात बळकट करण्यासाठी खंबीरपणे भाजपच्या पाठीशी उभे रहावे, असे आवाहनही भाजप आणि महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी याप्रसंगी केले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here