आमदार बबनराव शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त विक्रमी 4 हजार 571 रक्तदात्यांचे रक्तदान!
विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन आ.बबनराव शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त गावोगावी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरामध्ये कारखान्याचे सभासद, ऊस पुरवठादार, वाहतूकदार, अधिकारी, पदाधिकारी, कर्मचारी,कार्यकर्ते व इतर सहकारी यांनी ऊस्फुर्त सहभाग नोंदवून रक्तदानाचा 4 हजार 571 टप्पा गाठून विक्रम प्रस्थापित केला आहे.
विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन आमदार बबनराव शिंदे यांचे 1 सप्टेंबर रोजीचे वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम म्हणून माढा तालुक्यात ठिकठिकाणी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये आ.बबनराव शिंदे यांच्या आवाहनानुसार कारखान्याचे सभासद, ऊस पुरवठादार, वाहतूकदार, अधिकारी, कर्मचारी,कार्यकर्ते व इतर सहकारी यांनी ऊस्फुर्त सहभाग नोंदवून रक्तदान केले. त्यामध्ये विठ्ठलराव शिंदे साखर कारखाना युनिट नं.1 पिंपळनेर, युनिट नं.2 करकंब, आर्या पब्लीक स्कुल-माढा गट, थोरात मंगल कार्यालय-टेंभूर्णी गट, महादेव मंदीर-बेंबळे गट,संकेत मंगल कार्यालय-कुर्डूवाडी गट, श्रीपूर गट) रांझणी-भिमानगर गट, मोडनिंब गट, बबनरावजी शिंदे शुगर केवड, कमला भवानी कारखाना, टेंभूर्णी कॉलेजसह इतर कॉलेज या एकूण 13 ठिकाणी रक्तदान शिबिराच आयोजन करून एकुण 4 हजार 571 इतके रक्तदान झाले.
या रक्तदान शिबिरामध्ये सोलापूर येथील डॉ.हेडगेवार रक्तपेढी, सिध्देश्वर रक्तपेढी, सिव्हील हॉस्पीटल रक्तपेढी, मेडीकेअर रक्तपेढी, आश्विनी रक्तपेढी, मल्लिकार्जून रक्तपेढी, महात्मा बसवेश्वर रक्तपेढी, अतहर रक्तपेढी,अक्षय रक्तपेढी,सोलापूर रक्तपेढी, सरजुबाई बजाज रक्तपेढी- पंढरपूर, श्री रामभाई शहा रक्तपेढी, बार्शी, भगवंत रक्तपेढी- बार्शी, स.म.शंकरराव मोहीते पाटील रक्तपेढी, अकलूज, मुक्ताई रक्तपेढी-इंदापूर, कुर्डूवाडी ब्लड स्टोअरेज, कमलाभवानी रक्तपेढी, यासह इतर रक्तपेढ्यांनी उपस्थित राहून रक्त संकलन केले.
विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना युनिट नं.1 पिंपळनेर येथे रक्तदान शिबिराचे उद्घाटन संचालक तथा जि.प.सदस्य रणजितसिंह शिंदे यांचे शुभहस्ते युनिट नं.2 करकंब येथील उद्घाटन व्हाईस चेअरमन वामनराव उबाळे यांचे शुभहस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे सुरूवातीस कै.मा.आ.विठ्ठलराव शिंदे यांचे प्रतिमेचे पुजन करण्यात आले. सदर प्रसंगी सर्व संचालक मंडळ, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
कारखान्याचे सभासद, ऊस पुरवठादार, वाहतूकदार, अधिकारी, पदाधिकारी, कर्मचारी, कार्यकर्ते व इतर सहकारी यांनी शिबिरामध्ये ऊस्फुर्त सहभाग नोंदवून रक्तदान केले बद्दल व्हाईस चेअरमन वामनराव उबाळे, संचालक रणजितसिंह शिंदे, विक्रमसिंह शिंदे, सर्व संचालक मंडळ, कार्यकारी संचालक एस.एन.डिग्रजे व युनिट नं.2 चे जनरल मॅनजेर एस.आर.यादव यांनी आभार व्यक्त केले.