आमदार बबनराव शिंदे यांचे वाढदिवसानिमित्त 770 रक्तदात्यांचे रक्तदान

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

आमदार बबनराव शिंदे यांचे वाढदिवसानिमित्त 770 रक्तदात्यांचे रक्तदान

 

माढा तालुक्याचे लोकप्रिय आमदार बबनराव शिंदे यांच्या 70 व्या वाढदिवसानिमित्त विठ्ठलराव शिंदे बहुउद्देशीय सांस्कृतिक मंडळ निमगांव टे व विठ्ठलराव शिंदे साखर कारखाना कार्यस्थळावर 1 सप्टेंबर,2021 रोजी सकाळी 9 ते दु. 4 या वेळेत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सदर रक्तदान शिबिरामध्ये कारखान्याचे युनिट नं.1 व युनिट नं.2 येथील सभासद शेतकरी व कार्यकर्ते अधिकारी व कर्मचारी यांनी रक्तदानासाठी उस्फुर्त सहभाग नोंदवून एकुण 770 रक्तदात्यांनी रक्तदान केलेअसल्याची माहीती कारखान्याच कार्यकारीसंचालक एस.एन.डिग्रजे यांनी दिली.

आ. शिंदे यांचे वाढदिवसानिमीत्त प्रति वर्षी विठ्ठलराव शिंदे बहुउद्देशीय सांस्कृतिक मंडळ व विठ्ठलराव शिंदे साखर कारखाना यांचेमाध्यमातून रक्तदान शिबिराचे उद्‌घाटन कारखान्याचे व्हाईस चेअरमन वामनभाऊ उबाळे यांचे शुभहस्ते व जि.प.सदस्य रणजितसिंह शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत कै. आ.विठ्ठलराव शिंदे यांच्या प्रतिमा पुजन व दिप प्रज्वलनाने करण्यात आले. सदर रक्तदान शिबिरामध्ये रक्त संकलनासाठी श्री. भगवंत रक्तपेढी बार्शी, स.मं.शंकरराव मोहीते पाटील रक्तपेढी अकलुज, कुर्डूवाडी रक्तपेढी सेंटर कुर्डूवाडी, मुक्ताई रक्तपेढी सेंटर इंदापूर,अतहर बल्ड बँक सोलापूर, मेडिकेअर रक्तपेढी सेंटर सोलापूर, हेडगेवार ब्लड बँक सोलापूर, बजाज ब्लड बँक पंढरपूर,रामभाई शहा रक्तपेढी बार्शी या रक्तपेढीने उपस्थित राहून रक्त संकलन केले. यामध्ये युनिट नं.1 पिंपळनेर व युनिट नं.2 करकंब येथील कारखाना अधिकारी व कर्मचारी, शेतकरी व कार्यकर्ते यांनी रक्तदानासाठी उस्फुर्त सहभाग नोंदवून एकुण 770 रक्तदात्यांनी रक्तदान केले. सध्या कोरोना महामारीचे पार्श्वभुमीवर कोरोनाग्रस्त रूग्ण व इतर आजारावरील उपचारासाठी मोठ्या प्रमाणावर रक्ताची गरज भासत आहे अशा गरजू रुग्णांना रक्त पुरवठा वेळेत मिळणेचे दृष्टीने रक्तदान शिबीराचे आयोजन करणेत आलेले होते. सर्व रक्तदात्यांना 1 मास्क व 1 लीटर सॅनिटायझर वाटप करण्यात आले तसेच कुर्डुवाडी येथील आधार, उपचार व पुनर्वसन प्रकल्प उम्मीद या संस्थेतील मुलांना व टेभूर्णी येथील गोविंद वृद्धाआश्रमातील वृध्दांना मिठाई,अल्पोपहार व फळे वाटप करण्यात आले.

 

सदर प्रसंगी कारखान्याचे संचालक,सुरेश बागल,पोपटमामा चव्हाण, शिवाजी डोके,पांडूरंग घाडगे, माढा तालुका राष्ट्रवादी युवक अध्यक्ष,संभाजी पाटील,बंडूनाना ढवळे, संदीप (भैया) पाटील,नागाभाऊ खटके, कार्यकारी संचालक एस. एन. डिग्रजे, जनरल मॅनेजर एस.आर.यादव (युनिट.2), वर्क्स मॅनेजर सी.एस.भोगाडे, केन मॅनेजर एस.पी. थिटे, जनरल मॅनेजर (प्रोसेस) पी.एस.येलपले, फायनान्स मॅनेजर डी.डी. लव्हटे, डिस्टीलरी मॅनेजर पी.व्ही.बागल, जनरल मॅनेजर (एच.आर.) थोरात, मुख्य शेतकी अधिकारी एस.एस.बंडगर, शेतकी अधिकारी एम.एम.चंदनकर, परचेस ऑफिसर जे.डी.देवडकर, मार्केटींग ऑफिसर एन.एम. नायकुडे, सिव्हील इंजिनिअर एस.आर.शिंदे, हेड टाईम किपर अत्तार, सुरक्षा अधिकारी एफ.एम.दुंगे, कामगार प्रतिनिधी अनिल वीर, युनिट नं.2 चे चिफ इंजिनिअर महामुनी , शेतकी अधिकारी इंगोले,ऊस पुरवठा अधिकारी बालाजी गिड्डे, चिफ केमिस्ट बी.जे.साळुंखे, तानाजी लोंढे अधिकारी व कर्मचारी तसेच सभासद शेतकरी उपस्थित होते.

चौकट –

आ. बबनदादा शिंदे यांचे वाढदिवसानिमित्त श्रध्दा केटर्सचे श्री. सचिन बळीराम परबत चिंचगांव यांनी 1000 रक्तदाते व स्वयंसेवकांसाठी मोफत जेवणाची सोय केली होती.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here