आपल्या मातीपासून दूर गेल्याने मराठी चित्रपट मागे पडला- प्रवीण तरडे पंढरपूर अर्बनच्या वतीने गणेशोत्सव व नवरात्रोत्सव मंडळांना बक्षिसाचे वितरण

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

दक्षिणेतील चित्रपटामध्ये आज देखील त्यांचा धर्म, प्रश्‍न, सामाजिक वातावरण हे दाखविले जाते. यामुळे त्यांचे चित्रपट यशस्वी होतात, कोट्यवधी रूपयाचा व्यवसाय करतात. परंतु मराठी चित्रपटसृष्टी माती पासून दूर गेल्यामुळे आपण मागे पडलो असल्याची खंत लेखक, दिग्दर्शक व प्रसिध्द मराठी अभिनेते प्रवीण तरडे यांनी व्यक्त केली.

दि पंढरपूर अर्बन को.ऑप.बँकेच्या वतीने आयोजित देशभक्त कै.बाबुराव जोशी व्याख्यानमालेची सांगता सिने अभिनेते प्रवीण तरडे यांच्या व्याख्यानाने झाली. तरडे यांनी मराठी चित्रपटसृष्टी या विषयावर अतिशय मार्मिक शब्दात मराठी चित्रपटाचे वास्तव मांडले. यास उपस्थितांनी मोठा प्रतिसाद दिला. दरम्यान यावेळी प्रवीण तरडे यांच्या हस्ते व युटोपियन शुगर्स कारखान्याचे अध्यक्ष उमेश परिचारक यांच्या उपस्थितीमध्ये गणेशोत्सव मंडळ व नवरात्रोत्सव मंडळांना विविध बक्षिसांचे वितरण करण्यात आले.

कार्यक्रमाच्या सुरूवातीलाच तरडे यांनी, पंढरपूर सारख्या शहरात मराठी चित्रपटसृष्टी या सारख्या वेगळ्या विषयावर व्याख्यान ठेवल्याबद्दल पंढरपूर अर्बन बँकेचे कौतुक केले. पुढे बोलताना प्रवीण तरडे यांनी, चित्रपटसृष्टीचे जनकच मराठी व्यक्ती असून ऐकेकाळी संपूर्ण भारतावर आपले वर्चस्व होते. परंतु आज देशभरात पंधरा हजार कोटी रूपयांचा चित्रपटाचा व्यवसाय होत असताना यामध्ये मराठी चित्रपटाचा व्यवसाय अवघा दोनशे कोटीचा असल्याची माहिती दिली. मागील पाच ते सहा वर्षा पासून हा व्यवसाय थोडा बहुत वाढला आहे. अन्यथा आपली मजल पन्नास कोटी पर्यंतच होती. पूर्वी मराठी चित्रपटांमध्ये यात्रा, जत्रा होत्या, पंढरीचा पांडुरंग, वारी, कुस्त्यांचे फड, भावकीचे राजकारण, ग्रामीण जीवन होते. शेती व शेतकरी हा चित्रपटाचा आत्मा होता. मात्र आपण हे सर्व सोडून सिनेमा केल्यामुळे मराठी माणूस आपल्याच चित्रपटापासून लांब गेला. दक्षिणेमध्ये आज देखील चित्रपटांमध्ये धर्म जपतात, जगात कितीही बदल झाले तरी सिनेमात लुंगी घातलेले कलाकार असतात आणि सर्वात महत्वाचे म्हणजे त्यांच्या निर्मात्यांना कोणी हे चित्रपट नाही पाहिले तरी आपली लोक हे सिनेमा पाहणारच याची खात्री असते. यामुळेच सध्या देशाची चित्रपटसृष्टी सलमान खान, शाहरूख खान चालवित नाहीत तर दक्षिणेतील निर्माते व कलाकार चालवत असल्याचे सांगितले.

मागील काही वर्षापासून मराठी चित्रपटाने देखील कुस बदलली असून छत्रपती शिवाजी महाराज व त्यांच्या मावळ्यांवर तसेच शेती, शेतकरी, धार्मिक या विषयांवर चित्रपट येत असल्याने चांगले व्यवसाय करीत आहेत. मराठी चित्रपटसृष्टीला पुन्हा सुवर्णकाळ येण्यासाठी मराठी माणसाने देखील आपले चित्रपट पहावेत असे आवाहन प्रवीण तरडे यांनी केले.  

 यावेळी गणेशोत्सव मंडळास सामाजिक कार्याबद्दल प्रथम पुरस्कार 1) न्यु स्टार गणेशोत्सव मंडळ, बडवे चर झोपडपट्टी, द्वितीय पुरस्कार 2) शिवस्मारक गणेशोत्सव तरूण मंडळ, स्टेशन रोड विभागून, शिवछत्रपती गणेशोत्सव तरूण मंडळ, प्रदक्षिणा मार्ग, तृतीय पुरस्कार 3) सहकार गणेशोत्सव तरूण मंडळ, सहकार चौक.

उत्कृष्ट मुर्ती प्रथम पुरस्कार 1) बॉर्डर बाल गणेश मित्र मंडळ, लोणार गल्ली, द्वितीय पुरस्कार 2) विघ्नहर्ता गणेशोत्सव तरूण मंडळ, तृतीय पुरस्कार 3) गौरीगणेश गणेशोत्सव तरूण मंडळ, अंबाबाई पटांगण.उत्कृष्ट सजावट प्रथम पुरस्कार 1) अचानक गणेशोत्सव तरूण मंडळ, संतपेठ, द्वितीय क्रमांक 2) अष्टविनायक गणेशोत्सव तरूण मंडळ, समता नगर, (पावनखिंड), तृतीय क्रमांक 3) मनोज दादा परचंडे गणेशोत्सव मित्र मंडळ, (गव्हाचा गणपती) व्यास नारायण झोपडपट्टी.उत्कृष्ठ मिरवणुक प्रथम क्रमांक 1) आदिशक्ती गणेशोत्सव तरूण मंडळ, महावीर नगर, द्वितीय क्रमांक 2)श्रीमंत लोकमान्य गणेशोत्सव तरूण मित्र मंडळ, संघर्ष गणेशोत्सव तरूण मंडळ, बाभळ गल्ली, तृतीय क्रमांक 3) नरवीर तानाजी गणेशोत्सव तरूण मंडळ, तानाजी चौक.उत्कृष्ट सजीव देखावा प्रथम क्रमांक 1) समस्त जुनीपेठ तालिम संघ गणेशोत्सव मंडळ, द्वितीय क्रमांक 2)लोकमत गणेशोत्सव मंडळ, तृतीय क्रमांक 3) सोन्या मारूती गणेशोत्सव तरूण मंडळ.नवरात्र पारितोषिक निकाल प्रथम क्रमांक 1) नवदुर्गा नवरात्र उत्सव तरूण मंडळ, द्वितीय क्रमांक 2) मातोश्री नवरात्र उत्सव मंडळ, तृतीय क्रमांक 3) शहीद भगतसिंग नवरात्र महोत्सव मंडळ.

सुत्रसंचालन बँकेचे संचालक शांताराम कुलकर्णी यांनी केले तर स्वागत बँकेचे संचालक हरिष ताठे यांनी केले. याप्रसंगी पांडुरंग कारखान्याचे संचालक दिनकरभाऊ मोरे, दाजी भूसनर, बँकेचे व्हा.चेअरमन दीपक शेटे, बँकेचे संचालक रजनीश कवठेकर, उदय उत्पात, चंद्रकांत निकते, पांडुरंग घंटी, सतीश मुळे, हरिष ताठे, भाऊसाहेब जगताप, सोमनाथ होरणे, सौ.रेखाताई अभंगराव, मुन्नागीर गोसावी, मनोज सुरवसे, तज्ञ संचालक राजेंद्र बजाज, प्रकाश कुलकर्णी, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उमेश विरधे, सरव्यवस्थापक राम उन्हाळे आदी मान्यवर उपस्थित होते. 

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here