आधार केंद्र येथे कर्ज मार्गदर्शन आणि कर्ज प्रक्रिया मदत कक्षाचे आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन.

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

 

माजी केंद्रीय गृहमंत्री श्री सुशीलकुमार शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाने आणि सोलापूरच्या कार्यसम्राट आमदार माननीय प्रणिती ताई शिंदे यांच्या संकल्पनेतून आणि सी.ए. सुशील बंदपट्टे यांच्या माध्यमातून तरुण वर्गाच्या स्वयंरोजगारासाठी आणि तरुण वर्गाच्या स्वप्नपूर्तीसाठी अतिशय महत्वाच्या अशा सोलापुरात पहिल्यांदाच कर्ज मार्गदर्शन आणि कर्ज प्रक्रिया मदत कक्षाची स्थापना अश्विनी हॉस्पिटल जवळील आधार केंद्र येथे करण्यात आले असून सदर कार्यालयाचे उदघाटन सोलापूरच्या कार्यसम्राट आमदार प्रणितीताई शिंदे ह्यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी आमदार प्रणिती शिंदे यांनी युवकांनी नोकरीच्या मागे न लागता स्वताचा व्यवसाय उभारून स्वताच्या पायावर उभे रहावे आणि त्यासाठी कर्ज मिळवून देण्यासाठी मदत किंवा व्यवसायासाठी मार्गदर्शन या मदत कक्षाच्या माध्यमातून करण्यात येईल जास्तीत जास्त युवकांनी याचा लाभ घ्यावा.

कार्यक्रमासाठी सोलापूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी चे अध्यक्ष श्री प्रकाश वाले, कार्याध्यक्ष संजय हेमगड्डी , मनोज यलगुलवार , महिला अध्यक्षा हेमाताई चिंचोळकर , नगरसेवक तौफीक हत्तुरे आणि विनोद भोसले , बाबा करगुळे ,मनीष गडदे , उदय चाकोते , अंबादास गुत्तीकोंडा, देवभाऊ गायकवाड , गणेश डोंगरे, तिरुपती परकीपंडला , पशुपती माशाळ, हाजी मलंग नदाफ ,बापू घुले , गौतम मसलखांब , भीमाशंकर टेकाळे, अरुण शर्मा , दीनानाथ शेळके, रामसिंग आंबेवाले, कुणाल गायकवाड , प्रवीण जाधव , मधुकर कांबळे यांच्यासह इतर कार्यकर्ते आणि चंद्रनील सोशल फौंडेशन चे सदस्य आणि मित्र परिवार इ. उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here