आदर्श शिक्षक अरुण नारायण जमदाडे यांचे दुःखद निधन 

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

आदर्श शिक्षक अरुण नारायण जमदाडे यांचे दुःखद निधन 

पंढरपूर : जि. प. प्रा. शाळा भाळवणी येथील आदर्श शिक्षक अरुण नारायण जमदाडे यांचे दि. २९ जून रोजी दुःखद निधन झाले ते गेल्या २३ वर्षांपासून जि. प. सेवेत होते यापैकी १७ वर्षांपासून भाळवणी येथे कार्यरत होते त्यांच्या एकूण सेवाकाळात अनेक विद्यार्थी शिष्यवृत्ती पात्र झाले होते तसेच त्यांना २००५ साली जि. प. आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित केले होते.तसेच त्यांना शिष्यवृत्ती मार्गदर्शक आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला होता .त्यांचे शैक्षणिक व सामाजिक कार्य प्रशंसनीय होते. त्याचबरोबर सध्या भाळवणी कोविड सेंटर येथे ट्रेसिंगसाठी अतिशय चांगले काम करत होते त्यांच्या अकस्मात मृत्यूमुळे भाळवणी, जैनवाडी पंचक्रोशीतील लोक खूप हळहळ व्यक्त करत असून खूप मोठे शैक्षणिक, सामाजिक आणि कौंटुंबिक नुकसान झाले आहे अशा प्रतिक्रिया उमटत आहेत.त्यांची मुलगी श्रद्धा अरुण जमदाडे सध्या भारती विद्यापीठ पुणे याठिकाणी वैद्यकीय शिक्षण घेत आहे. त्यांच्या पश्चात एक मुलगी, पत्नी, भाऊ, आई असा परिवार आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here