सोलापूर जिल्हा प्रतिनिधी
आढेगाव ता. मोहोळ येथील श्रीमंत बाजीराव पेशवे सैनिक विद्यालय या शाळेने पुळूज येथील शहीद पोलिस उपनिरीक्षक धनाजी व्हनमाने यांच्या कुटुंबातील व्यक्तींची भेट घेऊन या वीरपीता व वीरमातेला एका अभिनव पद्धतीने दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.
एक पाऊल जवानांसाठी या उपक्रमांतर्गत या शाळेचे संस्थापक आबासाहेब कांबळे, मुख्याध्यापिका वैशाली पेठे-कांबळे, सर्व शिक्षक वृंद व सैनिक विद्यालयाचे विद्यार्थ्यांनी आज पुळुज येथील गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत शहीद पोलिस उपनिरीक्षक धनाजी व्हनमाने यांच्या कुटुंबातील व्यक्तींची भेट घेऊन त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. या कुटूंबियांना त्यांच्या मुलाने केलेल्या अतुलनीय पराक्रमाची जाणीव करून दिली. त्यांचे सांत्वन केले. व दिवाळी साजरी करण्यासाठी विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेला आकाशकंदिल व पणती भेट दिली. तसेच विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेले शुभेच्छापत्र सुद्धा दिले. या कुटूंबासाठी पुणे येथून श्रीमंत बाजीराव पेशवे यांचे वंशज व विश्वालील ट्रस्ट पुणे चे देवव्रत बापट यांनी वीरपुरूष श्रीमंत बाजीराव पेशवे यांची प्रतिमा भेट दिली. या कुटूंबियांवर कोसळलेल्या दुःखाच्या डोंगरात आम्ही सदैव सहभागी असल्याचे संस्थेच्या मुख्याध्यापिका सौ. वैशाली पेठे-कांबळे यांनी सांगितले. आम्ही केवळ सोशल माध्यमातून प्रचार करत नाही तर लोकांच्या अडचणी समजावून घेतो व त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करतो असे आबासाहेब कांबळे म्हणाले. यावेळी वीरपीता तानाजी व्हनमाने, वीरबंधू विकास व्हनमाने, वीरमाता राणुबाई व्हनमाने, सर्जेराव व्हनमाने, बंटू व्हनमाने, सरपंच शिवाजी शेंडगे, माजी सरपंच लक्ष्मण पांढरे, युवराज शिंदे, लिंगादेव निळगुंडे, मोहन खरात, प्रकाश खरात, ग्रामसेवक प्रक्षाळे भाऊसाहेब , महेश कांबळे, महादेव शेंडगे,दीपक गावडे , बापू शिंदे, जब्बर मुलांनी ,भिवा नाईक, राजू पांढरे ,सचिन खरात, विजय वाघमारे, राजू माने, तुकाराम तेरवे ,आणि पुळूज शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दत्तात्रय पांढरे आदी मान्यवर उपस्थित होते.