आठ दिवसापूर्वी दिलेले वचन नव्या दिवशी राजाभाऊ खरे यांनी केले पुर्ण! सरकोली येथील श्री तुळजाभवानी मंदिराच्या बांधकामाचे उद्योजक राजाभाऊ खरे यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न! दिलेले वचन पूर्ण करणारे नेते म्हणजे राजाभाऊ खरे: रामहरी भोसले

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

आठ दिवसापूर्वी दिलेले वचन नव्या दिवशी राजाभाऊ खरे यांनी केले पुर्ण!

सरकोली येथील श्री तुळजाभवानी मंदिराच्या बांधकामाचे उद्योजक राजाभाऊ खरे यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न!

दिलेले वचन पूर्ण करणारे नेते म्हणजे राजाभाऊ खरे: रामहरी भोसले

मोहोळ मतदार संघातील पंढरपूर तालुक्यातील सरकोली येथे श्री तुळजाभवानी मंदिराचा करण्याचे वचन नेते उद्योजक राजाभाऊ खरे यांनी गेल्या आठ दिवसांपूर्वी सरकोलीकरांना दिले होते. त्यानंतर त्यांनी कोणतीही वेळ न दवडता काही दिवसात राजाभाऊ खरे यांच्या स्वखर्चातून या कामास गती देत श्री तुळजाभवानी मंदीराच्या बांधकामाचे भूमिपूजन उद्योजक राजाभाऊ खरे यांच्या हस्ते करण्यात आले.

सध्या तरी मागेल त्याला रस्ता,मागेल त्याला पाणी अशी संकल्पना राबवित आणि दिलेले वचन पाळणारा नेता म्हणजे राजाभाऊ खरे हे आहेत अशी भावना मोहोळ मतदार संघातील सर्वसामान्यांमध्ये चर्चिले जात आहे त्यामुळे सर्वसामान्य जनतेतून मोहोळ मतदारसंघाचा आमदार राजाभाऊ खरे हेच पाहिजे अशी गावागावातील सर्वसामान्य जनतेतून बोलले जात आहे.

यावेळी पुढे बोलताना खरे म्हणाले की,या सरकोली गावात ज्यावेळेस आलो त्यावेळी श्री तुळजाभवानी मंदीरास निधी देऊन सभामंडप बांधणार असल्याचे वचन दिले होते त्या कामाचे भूमिपूजन संपन्न झाले. तसेच यापुढे देखील मी या जनतेसाठी काम करत राहणार आहे असल्याचे आश्वासन दिले.

यावेळी पतसंस्था चेअरमन रामहरी भोसले, कल्याण भोसले, नवनाथ आसबे, चिंतामणी भोसले, राज दिघे, विनायक भोसले, संभाजी पवार, नागेश भोसले, अंबादास पवार, सिद्धेश्वर माने, ऋषिकेश दिघे, भाऊ शिंदे, शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, मान्यवर सरकोलीतील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here