आज राज्यात 8,395 रुग्ण बरे होऊन घरी, 9,489 नव्या रुग्णांची नोंद.

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

आज राज्यात 8,395 रुग्ण बरे होऊन घरी, 9,489 नव्या रुग्णांची नोंद.

(कोल्हापूर शहर व जिल्ह्यात सर्वाधिक कोरोना बाधित रुग्ण)

वृत्तसंस्था // प्रतिनिधी

राज्यात दैनंदिन कोरोना बाधित रुग्णांची संख्या काही दिवसांपासून दहा हजारांच्या आत येऊ लागली आहे. राज्यात आज 8,395 रुग्णांना डिस्चार्ज मिळाला तर 9,489 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर राज्यातील अॅक्टिव्ह केसेस एक लाख 17 हजारांच्या वर आहेत. आज मालेगावमध्ये एकही कोरोना रुग्णांची नोंद सरकारी आकडेवारीनुसार झालेली नाही. तर कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक 1289 तर कोल्हापूर शहरात 376 असे एकूण 1665 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. आज सरकारी आकडेवारीनुसार राज्यातील 38 शहरं आणि जिल्ह्यांमध्ये एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही.

राज्यात काल 8,753 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली होती तर 8,385 कोरोना बाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला होता. आजपर्यंत 58,45,315 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्याचा रिकव्हरी रेट 96.01 टक्क्यांवर गेला आहे.तर राज्यात आज 153 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 2. 01 टक्के आहे. राज्यात सध्या 1,17,575 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96 टक्के एवढे झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 4,23,20,880 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 60,88,841 (14.39 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 6,32,949 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 4,422 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here