आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका निवडणुकीत हिंगोली जिल्ह्यात मनसेला विजयी करा-मनसे नेते दिलीप बापू धोत्रे.

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती ,नगरपालिका, निवडणुकीच्या तयारीसाठी महाराष्ट्र नविर्माण सेनेच्या वतीने संपूर्ण मराठवाड्यात मोर्चे बांधणीला सुरुवात झाली असून मनसेने ते दिलीप बापू धोत्रे ,प्रदेश सरचिटणीस संतोष नगरगोजे मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यात जाऊन त्या त्या ठिकाणी विभाग वर बैठका घेत आहेत .
आज हिंगोली जिल्ह्यातील मनसेच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांची बैठक हिंगोली येथे घेण्यात आली. यावेळी विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी मनसे त प्रवेश केला.
यावेळी कार्यकर्ते पदाधिकारी यांना मार्गदर्शन करताना मनसे नेते दिलीप बापू धोत्रे म्हणाले की महाराष्ट्रातील जनतेचा काँग्रेस ,राष्ट्रवादी ,शिवसेना, भाजप या पक्षांवर विश्वास राहिला नसून जनतेला फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडूनच आशा आहेत. येणाऱ्या निवडणुकीला सर्व पदाधिकाऱ्यांनी सामोरे जायचे असून हिंगोली जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा परिषद सदस्य ,पंचायत समिती सदस्य ,नगरसेवक हे विजयी करण्यासाठी सर्वांनी कामाला लागावे असे आवहान मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांनी केले .सध्या मराठवाड्यामध्ये प्रचंड पाऊस झाला असून शेतकऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे . सरकारने शेतकऱ्यांना त्वरित मदत करावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
प्रदेश सरचिणीस संतोष भाऊ नागरगोजे,हिंगोली जिल्हाध्यक्ष ट्रिपल नगरसेवक बंडू कुटे,जिल्हा उपाध्यक्ष विनोद बांगर,जिल्हा उपाध्यक्ष दिपकराव वडकुते,हिंगोली शहराध्यक्ष संतोष बांगर,शेतकरी सेना जिल्हा अध्यक्ष संतोष खंदारे,हिंगोली तालुका अध्यक्ष माऊली कामखेडे,,तालुका अध्यक्ष विठ्ठल जाधव,औंढा तालुका अध्यक्ष दीपक सांगळे,वसमत तालुका अध्यक्ष काशिनाथ टोम्पे,कळमनुरी तालुका अध्यक्ष विठ्ठल देशमुख, सेनगाव तालुका अध्यक्ष दत्तराव देशमुख,सरपंच अतुल घुगे,औंढा शहराध्यक्ष दीपक जगताप,अजिंक्य घुगे,आकाश धनमाने, राजू राठोड,विनोद गांजरे,किरण चोतमल,शाम खाडे, राहुल सावंत,गजानन कानडे,दिलीप गादेकर,राजू मस्के,रमेश जाधव, गजानन राखूनडे,प्रभू बोटे इत्यादि उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here