आई रुक्मिणी माता विदर्भातील इतर दिंड्यांना पदरात घ्यातील का ?

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

आई रुक्मिणी माता विदर्भातील इतर दिंड्यांना पदरात घ्यातील का ?

समन्वयातून मार्ग काढला तर विदर्भातून ऐतिहासिक सोहळा होऊ शकतो

कौंडण्यपूर विठ्ठल रुक्मिणी विश्वस्त मंडळी, पालकमंत्री यशोमती ठाकूर आणि प्रशासनाने सर्वांच्या समन्वयातून आणि वारकरी संघटनांना विश्वासात घेऊन जर आई रुक्मिणी मातेच्या पालखी सोहळ्या सोबत इतरही दिंड्यांना स्थान प्राप्त करून दिले तर विदर्भामध्ये आई रुक्मिणी मातेने सर्व संतांना पदरात घेऊन आपल्या सोबत आषाढी वारीला पंढरपूरला नेऊन सर्व संतांची वारी घडऊन आणल्यामुळे हा एक ऐतिहासिक सोहळा होऊ शकतो

आषाढी वारी निमित्त महाराष्ट्रातून मानाच्या फक्त दहा पालख्या वाहनाने जाणार आहेत आणि त्यामध्ये विदर्भातील आई रुक्मिणी मातेच्या पालखी सोहळ्याचा समावेश आहे पण विदर्भा मधून इतरही काही दिल्या शेकडो वर्षाची पायी जाण्याची परंपरा जोपासत आहेत म्हणून इतरही दिंड्यांना वाहनाने का होईना पण आषाढी वारी मध्ये सहभागी होता यावे याकरिता विश्व वारकरी सेनेने पालकमंत्री यशोमती ठाकूर व माननीय नाना पटोले साहेब यांना विनंती करून प्रशासकीय मीटिंग लावण्यात आली होती
आणि त्या मीटिंगमध्ये आई रुक्मिणी माता कौंडण्यपूर संस्थान यांच्या पालखी सोहळ्या सोबत इतर प्रत्येक दिंडीतील किमान एक वारकरी विणेकरी स्वरूपात सहभागी करून घ्यावा ही विनंती करण्यात आली होती व वारकऱ्यांच्या मागणीचा गांभीर्याने विचार करून विदर्भातील इतरही दिंड्यांना आषाढी वारी मध्ये सहभागी होण्याची संधी प्राप्त करून देण्यात येईल असे आश्वासन पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी केले होते
विदर्भातील बऱ्याच दिंड्यांचे प्रतिनिधी विश्व वारकरी सेनेच्या संपर्कात असून वेळोवेळी आषाढी वारी मध्ये आम्हाला संधी मिळेल की नाही अशी विचारणा करत असल्यामुळे आज पालकमंत्री यशोमती ठाकूर, विठ्ठल रुक्मिणी संस्थान कौंडण्यपूर, जिल्हाधिकारी साहेब अमरावती यांना स्मरण पत्र पाठवण्यात आलेला आहे
आम्ही निवेदनाद्वारे नम्र विनंती करतो की विठ्ठल रुक्मिणी समिती कौंडण्यपूर ,जिल्हाधिकारी साहेब अमरावती आणि पालक मंत्री यशोमती ठाकूर यांनी समन्वयाची भूमिका घेऊन कौंडण्यपूर समितीच्यावतीने वीस वारकरी, किमान 15 दिंडीचे प्रत्येकी एक पंधरा प्रतिनिधी विणेकरी स्वरूपात आणि पाच वारकरी संघटनांचे पाच प्रतिनिधी असे एकूण 40 वारकरी आषाढी वारी मध्ये सहभागी करून घेण्यात यावे ही विनंती करण्यात आलेली आहे
जर आई रुक्मिणी मातेच्या सोबत इतर संतांच्या पादुका पंढरपूरला गेल्या तर महाराष्ट्रा मधून हा एक ऐतिहासिक सोहळा निर्माण होऊ शकतो म्हणून आम्ही विश्व वारकरी सेनेच्या वतीने केलेली ही विनंती कौंडण्यपूर संस्थान, पालकमंत्री यशोमती ठाकूर आणि प्रशासनाने मान्य करावी अशी विनंती ह.भ.प. गणेश महाराज शेटे विश्व वारकरी सेना संस्थापक अध्यक्ष यांच्यावतीने करण्यात आलेली आहे

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here