आंतर पदविका क्रीडा स्पर्धेमध्ये न्यु सातारा पॉलिटेक्निकच्या विद्यार्थिनींचा संघ ठरला खो-खो स्पर्धेत उपविजेता

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

आंतर पदविका क्रीडा स्पर्धेमध्ये न्यु सातारा पॉलिटेक्निकच्या विद्यार्थिनींचा संघ ठरला खो-खो स्पर्धेत उपविजेता

न्यु सातारा समुह मुंबई संचलित न्यु सातारा कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंट पॉलीटेक्निक कॉलेज कोर्टी मधील मुलींचा खो-खो चा संघ शासकीय तंत्रनिकेतन सोलापूर येथे , आंतर पदविका क्रीडा स्पर्धा 2023-24 (IEDSSA)अंतर्गत घेण्यात आलेल्या खो खो स्पर्धेमध्ये महाविद्यालयाचा मुलींचा संघ उपविजेता ठरला. यामध्ये आरती डोके, शुभांगी लोंढे, आरती बनसोडे, गौरी काळे, नूतन गवळी, आदिती शिंदे, सिद्धी काळे, प्रणवी भोसले, वैष्णवी मिसाळ, स्नेहल सुर्वे, वैभवी दुपडे, वैष्णवी माडकर, स्नेहल सुर्वे, स्नेहा पवार, श्रुती तळेकर या विद्यार्थिनींनी सहभाग नोंदवला. स्पोर्ट कमिटी हेड श्री. विश्वनाथ कुंभार सर आणि त्यांची टीम यांनी विद्यार्थ्यांकडुन नियमित सराव करून घेतला. या संघातील विद्यार्थ्यांना श्री. गणेश पडवळकर सर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.कॉलेजचे संस्थापक अध्यक्ष राजाराम निकम यांच्याकडुन सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले.

कॉलेजचे संस्था प्रतिनिधी ज्ञानेश्वर शेडगे, कॉलेजचे प्राचार्य विक्रम लोंढे यांनीही विद्यार्थिनींचे व क्रीडा समितीचे अभिनंदन केले या वेळी उपप्राचार्य व ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर विशाल बाड , सर्व विभाग प्रमुख, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच सर्व विद्यार्थी उपस्थित होते .

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here