अहमदनगर येथे उद्योग व व्यापाऱ सेलची आढावा बैठक संपन्न.

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

अहमदनगर येथे उद्योग व व्यापाऱ सेलची आढावा बैठक संपन्न.

मा .आमदार संग्राम भैया जगताप यांचे अध्यक्षतेखाली व मा .आ . निलेश लंके, राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष मा . घनःशाम शेलार, राष्ट्रवादी अहमदनगर जिल्हा अध्यक्ष मा .राजेंद्र फाळके, राष्ट्रवादी शहर अध्यक्ष मा . माणिकराव विधाते व राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते मा . बाळासाहेब जगताप यांचे उपस्थित उदयोग व व्यापार विभागाचे प्रदेश अध्यक्ष मा . नागेश फाटे यांनी आढावा बैठक घेतली .
यावेळी शहरातील उदयोग व व्यापार संदर्भातील अडी- अडचणी जाणून घेतल्या यावेळी मा .आमदार महोदयांनी शहरातील युवकांना आर्थिक पाठबळ महामंडाळा मार्फत करुन त्यांना उदयोगासाठी सहकार्य करून एम आय डी सी मध्ये उदयोग करण्यासाठी संधी देवून पक्ष संघटन वाढवणे गरजेचे आहे अशी सूचना मांडली
यावेळी फाटे यांनी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ , महाराष्ट्र राज्य अपंग वित्त व विकास महामंडळ , वसंतराव नाईक विमुक्त जाती व जमाती विकास महामंडळ , महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ , संत रोहीदास चर्मोदयोग व चर्मकार विकास महामंडळ , साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ आणि इतर महामंडळे यांच्या मार्फत तरुणांना आर्थिक पाठबळ देवून राज्य कार्यकारीणी तसेच जिल्हा कार्यकारीणी तालुका कार्यकारीणी करून या सर्वांचा समन्वय साधून नविन युवक या उदयोग व्यापार सेल मध्ये जोडून त्यांना स्वतःचा उदयोग उभा करण्यास सहकार्य करू . तसेच आदरणीय शरदचंद्रजी पवार राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा पवार ना .जयंतराव पाटील , खा . सुप्रियाताई सुळे यांचे मार्गदर्शन घेवून युवक वर्गास उदयोगधंदयासाठी सहकार्य करू असे आश्वासन फाटे यांनी दिले .
यावेळी नगर राष्ट्रवादी शहर अध्यक्षा श्रीमती . रेशमाताई आठरे, खजिनदार वसंत कांबळे , गोरख पडोळे , युवराज जगताप , संजय चव्हाण , शेखर पंचमुख, राष्ट्रवादी पंढरपूर ता . उपाध्यक्ष कल्याण कुसूमडे आदी पदाधिकारी उपस्थित होते .

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here