अवकाळी पावसामुळेशेतकऱ्यांचे झालेलेनुकसानभरपाई त्वरीत द्या.मा. दिलीप माने

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

सोलापूर जिल्हा प्रतिनिधी

सोलापूर जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे द्राक्ष बागाचे प्रचंड नुकसान झाले आहे.बाधीत शेतकऱ्यांचे पंचनामा करुन नुकसान भरपाई द्या, थकीत विजबिलापोटी डीपी व शेतीपंप विज कनेक्शन बंद करु नका,बंद केलेली कनेक्शन पुर्ववत जोडुन द्या या मागणीचे निवेदन मा.श्री.दिलीपराव माने(माजी आमदार सोलापूर)यांच्या नेतृत्वाखाली मा.जिल्हाधिकारी श्री मिलिंद शंभरकर व महावितरणचे अधिक्षक अभियंता श्री सांगळे यांना देण्यात आले.
यावेळी उत्तर सोलापूर पंचायत समितीचे सभापती रजनीताई भडकुंबे गंगाधर बिराजदार,चंद्रकांत कुबसंगे ,प्रथमेश पाटील, श्रीकांत मेलगे-पाटील, निबंर्गीचे उपसरपंच चन्नप्पा बोरगी ईरेशा कोळी,रावसाहेब अळगी, निशांत लाडे, निखील देशपांडे,विकास पाटील,सचिन गुंड,तोहीद पटेल, आदीसह दक्षिण सोलापूर व उत्तर सोलापूर तालुक्यातील कार्यकर्ते, युवक शेतकरी उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here