अवकाळी पावसाने नुकसानग्रस्त झालेल्या द्राक्ष बागेची आमदार समाधान दादा आवताडे यांनी प्रशासनास सोबत घेत बांधावर जाऊन केली पाहणी

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

अवकाळी पावसाने नुकसानग्रस्त झालेल्या द्राक्ष बागेची आमदार समाधान दादा आवताडे यांनी प्रशासनास सोबत घेत बांधावर जाऊन केली पाहणी

गेल्या दोन दिवसापासून पंढरपूर शहर व तालुक्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या द्राक्ष बागा, लिंबू व इतर बागांचे मोठे नुकसान झाले असून नुकसानग्रस्त बागांची पाहणी विविध शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन आज आमदार समाधान दादा आवताडे यांनी तहसीलदार सुशील बेल्हेकर यांच्यासह प्रशासनाचे अधिकारी कर्मचाऱी यांना सोबत घेत पाहणी केली.

 

गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाने द्राक्ष बाग शेतकऱ्यांसमोर अस्मानी संकट उभे राहिले आहे. द्राक्ष बागेवर फवारणी व इतर मोठा खर्च झाला असताना अवकाळी पावसामुळे हाताला आलेली द्राक्ष बाग गेल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्यांच्या या नुकसानीचे पंचनामे प्रशासनाने सरसकट करावे अशा सूचना प्रशासकीय अधिकाऱ्यांना आमदार समाधान दादा आवताडे यांनी दिल्या.

 

शेतकऱ्यांचे नुकसान न भरून निघणारे असले तरीही पूर्वी अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी 18 हजार रुपये मिळत होते. परंतु आता तेच हेक्टरी 22 हजार रुपये नुकसानग्रस्त म्हणून शेतकऱ्यांना मिळणार आहे. यामुळे एक वेळेचा फवारणी खर्चाचा लाभ तरी शेतकऱ्यांना मिळणार आहे. येत्या अधिवेशनामध्ये नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत कशी मिळवून देता येईल यासाठी आपण आवाज उठवू असेही आमदार समाधान दादा आवताडे यांनी सांगितले.

 

पंढरपूर तालुक्यातील अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बागांची पाहणी करुन नुकसान झालेल्या सर्व शेतकऱ्यांचे सरसकट पंचनामे करून सादर करण्याच्या सूचना आ. आवताडे यांनी दिल्या.

 

यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष विजयसिंह दादा देशमुख,तुकाराम आबा कूरे, ग्रा.प.स.वैभव लिंगे,भास्कर घायाळ,लक्ष्मण जाधव,अनिकेत देशमुख,हनुमंत ताटे,मारुती काळे मेंबर,सज्जन जाधव,दत्ता आबा रोंगे पाटील,प्रसाद भैया कळसे,दत्ता यादव अध्यक्ष,दत्तात्रय काळे महाराज,सुनील रणदिवे,अमीन भाई शेख,पांडुरंग करकमकर, महेश चव्हाण,धनाजी गावंदरे,नौशाद भाई शेख ,अंकुश डांगे,भागवत वाघमारे, जालिंदर गुंड,दीपक देशमुख, सोमनाथ गंगथडे,मारुती पिलवे व शेतकरी तसेच पत्रकार बांधव उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here