संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या पंढरपूर तालुक्यातील प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना भाळवणी या कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये आज मोठे घडामोड घडली असून संस्था मतदारसंघातून विद्यमान चेअरमन कल्याणराव वसंतराव काळे मातोश्री मालन काकू वसंतराव काळे बिनविरोध निवड झाली असून त्यामुळे संपूर्ण सोशल मीडिया वरती ही विजयाची सुरुवात असल्याचे त्यांच्या कार्यकर्त्यांकडून सांगण्यात येत आहे.
या संस्था मतदारसंघातून फक्त दोनच अर्ज असल्यामुळे कल्याणराव काळे यांनी स्वतः: अर्ज अर्ज माघारी घेऊन ही जागा बिनविरोध केली असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे व संध्याकाळपर्यंत काय-काय घडामोडी घडतात याकडे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.