अमिधरास व भागीरथीच्या शॉपिंग फेस्टिव्हलला उस्फुर्त प्रतिसाद!

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

अमिधरास व भागीरथीच्या शॉपिंग फेस्टिव्हलला उस्फुर्त प्रतिसाद!

इचलकरंजी येथे अमिधरास व धनंजय महाडिक युवाशक्ती महिला आघाडी प्रेरित सौ.अरुंधती धनंजय महाडिक यांच्या कुशल नेतृत्वाखाली भागीरथी महिला संस्था इचलकरंजी आयोजित १ व २ ऑक्टोबर रोजी महावीर भवन,बँक ऑफ बडोदा जवळ येथे सुरू असलेल्या शॉपिंग फेस्टिव्हल व फूड स्टॉलचे उद्घाटन सन्मती मतिमंद विद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने संपन्न झाले. अमिधरास,भागीरथी महिला संस्था व लोकमान्य मल्टिपरपज सोसायटीच्या वतीने सर्व नवउद्योजिका व स्टॉलधारकाना नवदुर्गा प्रमाणपत्राने सन्मानीत करण्यात आले.

सदर कार्यक्रमासाठी अमिधरासच्या अध्यक्षा अमृता भोसले,अनिता पाटील,भागीरथीच्या प्रिया पटवा,जलजा पाटील यांच्यासह लोकमान्य मल्टिपरपज सोसायटीचे शाखा प्रमुख विलास कदम,अभय पाटील,सन्मती विद्यालयाचे रविंद्र पाटील,लडगे काका यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी ऐश्वर्या पाटील,अवंती इंगळे,स्नेहल दामुगडे यांच्यासह स्वाती माळी,निर्मला बोरा,माधवी बोरा,संगीता चव्हाण,वैशाली बाबर,माधवी होसमनी तसेच धनंजय महाडिक युवाशक्तीचे जयराज पाटील,अभिजित पटवा यांच्यासह ऋतुराज दळवी,अमित पाटील उपस्थित होते.लोकमान्य सोसायटी तर्फे सर्व अमिधरास व भागीरथी संस्थेच्या महिलांना प्रोत्साहन दिल्याबद्दल व उत्कृष्ट नियोजन केल्याबद्दल गौरवण्यात आले.

महिला सक्षमीकरण व सबलीकरणासाठी कार्यरत दोन्ही संस्थामार्फत आयोजित सदर शॉपिंग फेस्टिव्हल मध्ये विविध प्रकारचे कपडे,इमिटेशन ज्वेलरी,बिस्कीट, क्लिनिंग मटेरियल,स्टेशनरी यासह दिवाळी साठी लागणारे साहित्य उपलब्ध असून ग्राहकांचा उत्कृष्ट प्रतिसाद मिळत असून शहरवासियांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन संयोजकामार्फत करण्यात आले आहे.

संयोजकांची सामाजिक बांधिलकी
अमिधारास व भागीरथी महिला संस्था यांच्यामार्फत सुरू असलेल्या प्रदर्शनात सन्मती मतिमंद विद्यालयातील दिव्यांग मुलांनी तयार केलेल्या वस्तुंना बाजारपेठ उपलब्ध व्हावी या उद्देशाने संयोजकांनी सदर संस्थेस मोफत स्टॉल उपलब्ध करून दिला व सदर विद्यार्थ्यांच्या हस्ते कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन करून कार्यक्रमास सुरवात केली,सामाजिक बांधिलकी जपत कार्यरत असलेल्या अमिधरास व भागीरथी महिला संस्थेचे उपस्थित नागरिकांकडून कौतुक करण्यात आले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here