अभिजीत आबा पाटील यांच्या संकल्पनेतून इफ्तार पार्टी उत्साहात संपन्न! (विठ्ठल परिवाराची पंरपरा याही वर्षी अभिजित आबांनी ठेवली कायम)

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

अभिजीत आबा पाटील यांच्या संकल्पनेतून इफ्तार पार्टी उत्साहात संपन्न!

(विठ्ठल परिवाराची पंरपरा याही वर्षी अभिजित आबांनी ठेवली कायम)

श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन, युवा नेते अभिजित आबा पाटील यांच्या वतीने काल दिनांक १९एप्रिल रोजी स्टेशन मज्जिद पंढरपूर येथे इफ्तार पार्टी कार्यक्रम संपन्न झाला यामध्ये हिंदू – मुस्लिम बांधव व महिला भगिनींनी मोठ्या संख्येने हजेरी लावलेली दिसून आली.सध्या अभिजीत पाटील यांचे राजकीय वातावरण चांगलेच तापले असून प्रत्येक ठिकाणी पाटील यांची उपस्थिती असून प्रत्येक कार्यक्रमात सहभागी होत आहेत.

 

दि.१६एप्रिल रोजी महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त महागायक आदर्श शिंदे यांचा गुरुशिष्य वंदना कार्यक्रमात चला करूया अभिजीत पाटील आबाला आमदार करूया या गाण्यामुळे मोठंच राजकीय वातावरण ढवळले आहे. प्रत्येक कार्यक्रमात प्रत्येक सणात मोठ्या उत्साहात सहभागी होत असताना दिसत आहेत. त्यांना नागरिकांकडून देखील बोलवण्याचा वाढता संपर्क असल्याने अभिजीत पाटील देखील उपस्थिती दर्शवितात.अभिजीत पाटील यांनी सर्व हिंदू मुस्लिम बांधवांना यांच्या रमजानच्या शुभेच्छा दिल्या.

 

यावेळी स्टेशन मज्जिद येथे इफ्तार सुरू करण्यात आला. यावेळी सर्व समाज बांधवांच्या भेटी घेत रमजानच्या शुभेच्छा दिल्या. सध्या रमजानचा पवित्र महिना सुरु आहे. या महिन्यात प्रत्येकाकडून रोजाचे पालन केले जाते. यात पहाटेच्या वेळी उपवास सुरु करताना सहरी केली जाते तर सोडताना इफ्तार केला जातो. इफ्तारच्या वेळी पंढरपूरातील असंख्य हिंदू-मुस्लिम बांधव इफ्तार पार्टीत सहभागी होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here