अनेक महिन्यांपासून फरारी असलेल्या आरोपीस पोलीसांनी केली अटक

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

अनेक महिन्यांपासून फरारी असलेल्या आरोपीस पोलीसांनी केली अटक

न्यायालयाने सुनावली पोलिस कोठडी

प्रतिनिधी – लक्ष्मण राजे

सफाळे:- केळवा सागरी पोलीस ठाणे ता,जि पालघर. येथे दिनांक ७ जानेवारी २०२० रोजी शितला देवी – आदर्श विद्यामंदिर शाळेजवळ मतदान चालू असताना, आरोपी उमेश संजय भोईर उर्फ मोरगा वय वर्षे २४, व्यवसाय मजुरी, राहणार सुभाष पाडा, केळवा ता,जि पालघर. व फिर्यादी महिला यांचे भांडण झाले होते. आरोपीने तो राग मनात धरून फिर्यादी महिला आपल्या पती सोबत, शितलादेवी मंदिरा समोरील रिक्षा स्टँडवर उभी असताना, आरोपीने हातात कोयता घेऊन फिर्यादी महिलेच्या मानेच्या मागिल बाजूस वार केला असता, फिर्यादी महिला खाली पडल्यावर, आरोपीने पुन्हा हातातील कोयत्याने फिर्यादीच्या गळ्यावर जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने, कोयत्याने वार केला असताना, फिर्यादिने जिव वाचविण्यासाठी प्रयत्न केला असताना, तो वार फिर्यादीच्या डाव्या हाताच्या दंडाच्या वरच्या बाजूस लागुन,जबर दुखापत झाल्याने, आरोपीने कोयत्या सह तेथून पळ काढला होता. तेव्हा पासून आरोपी फरार होता. आरोपी उमेश भोईर उर्फ मोरगा यांच्या वर सागरी पोलीस ठाणे ता,जि पालघर येथे गुन्हा रजि, नंबर ०१ /२०२० भा.द.वि.कलम ३०७,५०४,५०६, प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हा पासून आरोपी फरार होता. आरोपी मोबाईल फोनचा सुध्दा वापर करीत नव्हता. आरोपी दिवसा विरार, वसई, नालासोपारा, आदि परिसरात काम करून रात्री रेल्वे स्टेशन व परिसरातील ठिकाणी झोपत असे.आरोपी हा त्यांची आजी राहणार झांझरोली केळवा रोड परिसर येथे आजीस भेटण्यासाठी येणार असल्याची माहीती, केळवा सागरी पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी व कार्यरत कर्मचारी यांना प्राप्त झाली होती. केळवा सागरी पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी श्री भीमसेन गायकवाड – सहा, पोलीस निरीक्षक, श्री सदाशिव गुंजाळ, श्री जयदीप सांबरे, पोलीस शिपाई व इतर कार्यरत कर्मचारी यांनी आरोपी असलेल्या घरास चहुबांजुनी घेरून आरोपीस अटक केली. आरोपीस अटक करून मा. न्यायालयात हजर केले असताना आरोपीस न्यायालयाने १६ जुलै २०२१ पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. पुढील कारवाई वरिष्ठ पोलीस अधिकारी पालघर श्री भीमसेन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अंमलदार करीत आहेत.अशी माहिती हिरालाल लोखंडे यांनी दिली आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here