अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत पहिली, दुसरीसाठी प्रवेश घेण्याचे आवाहन

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

आदिवासी विकास विभागामार्फत 2022-23 या शैक्षणिक वर्षासाठी अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना इयत्ता पहिली आणि दुसरीसाठी निवासी नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळेत मोफत प्रवेश देण्यात येत आहेत. 10 मार्चपासून प्रक्रिया सुरू झाली असून लाभ घेण्याचे आवाहन एकात्मिक

           आदिवासी विकासच्या प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी मनीषा आव्हाळे यांनी केले आहे.
योजनेचा लाभ घेऊ इच्छिणारा विद्यार्थी अनुसूचित जमातीचा असावा. विद्यार्थी दारिद्र्यरेषेखालील असेल तर त्यासंबंधीच्या यादीतील अनुक्रमांक नमुद करावा. पहिली प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचे वय सहा वर्ष पूर्ण असावे. इयत्ता दुसरीच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्याकडे पहिलाचा शाळा सोडल्याचा दाखला असावा. विद्यार्थ्यांच्या जन्म तारखेसाठी ग्रामसेवक किंवा अंगणवाडीचा दाखला जोडण्यात यावा.

          प्रवेशासाठी पालकांनी नजीकच्या प्रत्येक शासकीय आश्रमशाळेतील मुख्याध्यापकांमार्फत विशिष्ट कालावधीत नाव नोंदणी करावी किंवा प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, सोलापूर या कार्यालयास संपर्क साधावा. या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी संमतीपत्र व शाळेत प्रवेशासाठी अर्जही द्यावा. अर्जासोबत दोन पासपोर्ट फोटो, जातीचा दाखला, रहिवाशी दाखला, उत्पन्नाचा दाखला व रेशनकार्ड इ. कागदपत्रे द्यावीत. अर्जासोबत विद्यार्थ्याचे वैद्यकिय प्रमाणपत्र जोडण्यात यावे. आदिम जमातीच्या विद्यार्थ्याची तसेच अपंग/विधवा/ घटस्फोटित / निराधार / परितक्त्या व दारिद्र रेषेखालील कुटूंबातील अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्याची प्राधान्याने निवड करून त्यांना नामांकित शाळांमध्ये प्रवेश दिला जाईल. विद्यार्थ्याचे पालक शासकीय / निमशासकीय नोकरदार नसावेत व खोटी माहिती सादर केल्यास प्रवेश रद्द करण्यात येईल.

       निवड केलेल्या विद्यार्थ्याला एकदा शाळा निश्चित झाल्यानंतर कोणत्याही परिस्थितीत पालकांच्या व पाल्यांच्या विनंतीनुसार शाळा बदलता येणार नाही. इच्छुकांनी एक लाख रूपये वार्षिक उत्पन्न मर्यादा व सक्षम अधिकाऱ्यांचे जातीचे प्रमाणपत्र आणि आवश्यक कागदपत्रासह अर्ज सादर करावेत, असे आवाहन श्रीमती  आव्हाळे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी एस. बी. आंधळे, कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी, मोबाईल नं. 8369688911 यांच्याशी संपर्क साधावा.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here