अनुदान, बीजभांडवल योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

अनुदान, बीजभांडवल योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

            

सोलापूर // प्रतिनिधी 

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामार्फत मातंग समाजातील लोकांची आर्थिक उन्नती होण्यासाठी अनुदान योजना व बीजभांडवल योजना राबविण्यात येत असून कर्ज योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक लक्ष्मण क्षीरसागर यांनी केले आहे.           

जिल्ह्याकरिता सन 2021-22 या वित्तीय वर्षासाठी अनुदान योजना भौतिक उद्दिष्ट 100 असून आर्थिक उद्दिष्ट रक्कम 10 लाख रूपये आहे. बीजभांडवल योजनेंतर्गत भौतिक उद्दिष्ट 30 असून आर्थिक उद्दिष्ट 27 लाख प्राप्त झाले आहे.             

जिल्हा कार्यालयामार्फत अनुदान योजना व बीजभांडवल योजनेसाठी कर्ज मागणी अर्ज वितरण करणे व अर्ज स्वीकारण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. मांग, मातंग, मिनी-मादीग, मादींग, दानखणी मांग, मांग महाशी, मदारी, राधेमांग, मांग गारुडी, मांग गोराडी, मादगी व मादिगा या समाजातील इच्छुकांनी दूरध्वनी क्र. 0217-2311523, इमेल-dmlasdcsolapur@gmail.com किंवा महामंडळाचे जिल्हा कार्यालय, डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, सात रस्ता, शासकीय विश्रामगृहाच्या पाठीमागे, बिग बजार समोर, सोलापूर येथे प्रत्यक्ष संपर्क साधावा, असे आवाहन श्री. क्षीरसागर यांनी केले आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here