अनिमल राहत ट्रस्टची संत दामाजी कारखान्यास भेट (या भेटीप्रसंगी चेअरमन शिवानंद पाटील यांची प्रमुख उपस्थिती)

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

अनिमल राहत ट्रस्टची संत दामाजी कारखान्यास भेट

(या भेटीप्रसंगी चेअरमन शिवानंद पाटील यांची प्रमुख उपस्थिती)

 

अनिमल राहत ट्रस्ट यांनी संत दामाजी साखर कारखान्यास मंगळवार दि।२८ नोव्हेंबर २०२३ रोजी भेट दिली। याप्रसंगी संत दामाजी साखर कारखान्याचे चेअरमन श्री शिवानंद पाटील यांनी सदर ट्रस्टचे सदस्यांचा सत्कार केला। याप्रसंगी कारखान्याचे संचालक श्री दयानंद सोनगे, श्री रेवणसिध्द् लिगाडे उपस्थित होते। अनिमल राहत ट्रस्टी ही संस्था प्राण्यांच्या आरोग्यासाठी काम करणारी संस्था आहे। सध्या दामाजी कारखान्याचा गाळप हंगाम सुरु असून कारखाना कार्यस्थळावर असणा-या बैलांना मोफत उपचार, बैलगाडीमध्ये क्षमतेपक्षा जास्त ऊस भरला जाऊ नये, प्राण्यांची काळजी, प्राण्यांना शुध्द् पाण्याचा पुरवठा, प्राण्यांचा अमानुष छळ होऊ नये याची कशा प्रकारे दक्षता घ्यायची आहे याबाबत ही संस्था मोफत मार्गदर्शन करीत आहे। गळीत हंगाम सुरु असताना अनेक कारखान्यावर जाऊन ही संस्था मार्गदर्शन करीत आहे।

याप्रसंगी अनिमल राहत ट्रस्टीचे सदस्य मिस पूर्वा, मिस्टर कोलींग, मिस्टर नायझल, डॉ.नरेश उपरेती, डॉ.चेतन यादव, डाù।प्रल्हाद भिसे, विकास दंदाडे, वैभव पाटील, माधवानंद पवार, कौस्तुभ पौळ, कारखान्याचे प्र।कार्यकारी संचालक रमेश जायभाय, प्र।कार्यालयीन अधिक्षक दगडू फटे, हेड टाईमकिपर आप्पासोा शिनगारे, ई।डी।पी।मùनेजर मनोज चेळेकर, शेती विभागाचे पंडीत गायकवाड, जगन्नाथ इंगळे, कारखान्याचे खाते प्रमुख, विभाग प्रमुख, कर्मचारी उपस्थित होते।

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here