भीमा सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील पंढरपूर,मोहोळ तालुक्यात भीमा परिवाराचे युवा नेतृत्व विश्वराज भैय्या महाडिक यांनी मोहोळ गावांना भेटीगाठी देऊन सर्व सभासद शेतकऱ्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या यावेळी त्यांनी पापरी,पेनूर,पाटकुल,सुस्ते व परिसरातील सर्व सभासद शेतकऱ्यांच्या, घरी जाऊन होम टु होम, सर्व सभासदांना सदिच्छा भेट दिली.
यावेळी बोलताना विश्वराज महाडिक म्हणाले की; गेल्या दोन गळीत हंगामामध्ये कारखान्याला काही तांत्रिक अडचणी तर काही मानवी निर्मिती अडचणी निर्माण झाल्या यामुळे आपल्याला थोडे पिछेहाट झाली होती अशा या कठीण काळात सुध्दा सर्व शेतकरी सभासदांनी आमच्या जो विश्वास ठेवला त्याबद्दल उतराई होणे अशक्य आहे तसेच कारखान्याच्या निवडणुकीपेक्षा येणाऱ्या गाळप हंगामासाठी जास्त लक्ष देणार त्याचप्रमाणे ऊसतोडणी कार्यक्रमानुसारच होणार असल्याचे आश्वासन विश्वराज महाडिक यांनी दिले.
यावेळी त्यांच्यासोबत भीमा परिवाराचे प्रवक्ते पांडुरंग तात्या ताटे, भीमा परिवाराचे जनसंपर्क अधिकारी बंडू साहेब शेख,भीमा परिवाराचे संघटक समन्वयक संग्राम दादा चव्हाण, सुनील चव्हाण भीमराव वशिकरण,विक्रांत मानाजी बापू माने,राजाराम बाबर, भारत पाटील, सरपंच शिवाजी शेंडगे किसन जाधव, धनाजी भोसले, संचालक अनिल गवळी प्राध्यापक राजकुमार पाटील सर, अजित पाटील, जाकिर भाई मुलाणी,जावेद शेख, पुळजचे उपसरपंच विनायक पाटील, संभाजी नाना कोकाटे, यशवंत बंडू चव्हाण अमर चव्हाण शरद लोकरे, गणेश पापा चव्हाण शिवसेनेचे नेते विलास चव्हाण, रामदास बापू चव्हाण, माधव बापू चव्हाण, तानाजी चव्हाण, संजय दादा चव्हाण, संचालक रामहरी रणदिवे एडवोकेट राजकुमार, तात्यासाहेब नागटिळक, सहदेव भाऊ यादव,संचालक बिभिशन बाबा वाघ, दत्तात्रय सावंत, शिवाजी लोमटे, सरपंच शिवाजी शेंडगे, विश्वास पांढरे, रामा चव्हाण, नागनाथ पवार,छगन पवार, विष्णु गावडे, एडवोकेट शक्तिमान माने, नितिन सावंत,याचबरोबर सर्व भीमा परिवारावर प्रेम करणारे असंख्य समर्थक कार्यकर्ते या गावांमध्ये उपस्थित होते.