अखेर बाळासाहेब माळी यांचा शोध संपला!
(गोंदवले येथुन माळी यांना घेतले ताब्यात)
भोसे येथील माजी जि प सदस्य व दत्तकृपा पेट्रोलपंपाचे मालक बाळासाहेब माळी हे दि १५ रोजी रात्री ०९च्या सुमारास मी आत्महत्या करीत आहे माझा शोध घेऊ नका असा संदेश सोशल मीडियावर वायरल करत त्यांचा साथीदार बंडू भुईरकर यांच्यासह बेपत्ता झाले होते.
याच वेळी बाळासाहेब माळी हे टेन्शनमध्ये असल्यामुळे त्यांची साथ बंडू भुईरकर यांनी सोडली नाही. माळी यांनी त्यांचा मोबाईल ही काढून घेतला होता व तू माझ्यासोबत येऊ नको असे वेळोवेळी म्हणत होते.परंतु त्यांचे सहकारी बंडू भुईरकर यांनी माळी यांची साथ न सोडल्यामुळे पुढील होणारा अनर्थ टळला.
मागील दोन दिवसांपासून माळी व भोईर कर यांचे मोबाईल बंद असल्यामुळे त्यांच्याशी कोणताही संपर्क होऊ शकत नव्हता.त्यांच्या पत्नी सुरेखा बाळासाहेब माळी यांनी करकंब पोलिसात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती.दोन दिवस करकंब पोलिस व नातेवाईक यांनी त्यांचा कसून तपास केला परंतु त्यांना यश मिळत नव्हते.अखेर बुधवारी दुपारी ११ च्या सुमारास भुईरकर यांनी त्यांच्या मोबाईल वरून सज्जन भोसले,पांढरेवाडी यांना गोंदवले येथे असल्याचे सांगितले. त्यानंतर भोसले यांनी बाळासाहेब माळी यांचे चुलत बंधू रामदास माळी यांना सोबत घेऊन तात्काळ गोंदवले गाठले त्यातच करकंब पोलिसांची मोबाईल लोकेशन तपासणी सुरू असल्याने त्यांना ही गोंदवले लोकेशन आढळून आले त्यामुळे करकंब पोलीस स्टेशनचे सपोनि यांचे पथकही तेथे पोहचले होते.त्यानंतर पोलोसांनी त्यांना वैद्यकीय तपासणी करून बाळासाहेब माळी व बंडू बुईरकर यांना रात्री 8 च्या सुमारास करकंब पोलिसांत घेऊन आले.
ही कामगिरी पोलीस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे व अप्पर पोलीस अधिक्षक हिंमत जाधव तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी पंढरपुर विभाग विक्रम कदम यांचे मार्गदर्शनखाली सपोनि निलेश तारू,पोहवा घोळवे, आर आर जाधव, सागर भोसले, पोना संतोष पाटेकर, अभिजीत कांबळे तसेच सायबर पोलीस ठाणेकडील पोकों अन्वर आत्तार यांनी कामगीरी केली आहे.