अकलूज कृषि उत्पन्न बाजार समितीची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न!

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

कृषि उत्पन्न बाजार समिती,अकलूज जिल्हा-सोलापूर

कृषि उत्पन्न बाजार समितीची वार्षिक सर्वसाधारण सभा दि. ३०/०९/२०२३ रोजी दुपारी ४.०० वाजता मुख्य मार्केट यार्ड,अकलूज येथे होणार आहे. त्या संबंधीची सभा नोटीस बाजार समितीचे सचिव यांनी नियमानुसार काढून माळशिरस तालुक्यातील सर्व ग्रामपंचायती, वि.का.स. सोसायटी, व्यापारी संघ व हमाल तोलार संघटना यांना दिलेली आहे. सदर वार्षिक सर्वसाधारण सभेकरीता महाराष्ट्र कृषि उत्पन्न खरेदी विक्री ( विकास व विनियमन) अधिनियम १९६३ मधील २७(अ) अन्वये बाजार क्षेत्रातील सर्व प्राथमिक कृषि संस्थेचे अध्यक्ष किंवा त्यांचे संचालका पैकी एक आणि सर्व ग्रामपंचातीचे सरपंच किंवा त्यांचे सदस्या पैकी एक(ब) व्यापारी यांचे ५ प्रतिनिधी (क) हमाल आणि तोलार यांचे ५ प्रतिनिधी तसेच बाजार समितीची आदर्श उपविधी मधील उपविधी क्र. ३४ (१) अन्वये बाजार क्षेत्रातील सर्व प्राथमिक कृषि पतसंस्थेतील अध्यक्ष किंवा त्यांचे संचालक पैकी एक व ग्रामपंचायतीचे सरपंच किंवा त्यांचे सदस्या पैकी एक यांनाच वार्षिक सर्वसाधारण सभेकरीता उपस्थित राहता येते.

ग्रामपंचायत तथा वि.का.स सोसायटींनी ठराव करून प्राधिकृत केलेले प्रतिनिधी यांना सभेकरीता उपस्थित राहता येते हे माहित असूनही सोशल मिडीयाच्या माध्यमातुन काही व्यक्ती ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य व वि.का.स सोसायटीचे सर्व संचालक यांना उपस्थित राहण्याचे अवाहन करून वि.का.स. सोसायटीचे संचालक व ग्रामपंचायत सदस्य यांच्यामध्ये संभ्रम निर्माण करीत आहेत.सोशल मिडियाच्या माध्यमातून केलेले आवाहन नियमबाह्य असून ते राजकीय हेतूने प्रेरीत आहे. बाजार समितीच्या वार्षिक सभेमध्ये अडथळा निर्माण करण्याच्या प्रयत्न दिसून येतो. तसेच ग्रामपंचायती, वि.का.स. सोसायटी, व्यापारी संघ व हमाल तोलार संघटनांच्या प्रतिनिधींच्या माध्यमातून आलेल्या स्वागतार्ह सुचनांवर बाजार समिती उपाययोजना करीत असते.बाजार समितीचा कारभार पारदर्शी व नियमानुसार चालू असून शेतक-यांच्या हिताला नेहमीच प्राधान्य देणारा आहे. अशी माहिती बाजार समितीचे उपसभापती श्री.मामासाहेब पांढरे यांनी दिली.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here